एटीएम न्यूज नेटवर्क : द्राक्ष निर्यातदारांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेच्या (ग्रेप एक्स्पोर्ट अससोसिएशन ऑफ इंडिया) अध्यक्षपदी कैलास भोसले यांची निवड करण्यात आली.
निफाड तालुक्यातील ओझर मिग येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड झाली आहे. यावेळी अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ खापरे उपस्थित होते.
या संघटनेच्या उपाध्यक्षपदी मयंक टंडन व राजाराम सांगळे यांची तर खजिनदारपदी विलास धुर्जड, सेक्रेटरीपदी राजेंद्र बोरस्ते, जॉईंट सेक्रेटरीपदी तुकाराम येलाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संघटनेच्या संचालकपदी बबनराव भालेराव, सह्याद्री फार्मचे विलासराव शिंदे, प्रीतम चंद्रात्रेय, लक्ष्मण सावळकर, परेश भयाणी, माणिकराव पाटील, भास्करराव शिंदे, मधुकर क्षीरसागर, बाळासाहेब वाघ, अमित पडोळ, मधुकर गवळी, अमित चोपडे, रावसाहेब रायते, मनोज लहाने, अविनाश कोळी, हरीश मोरे, तुषार खापरे यांची निवड झाली.