एटीएम न्यूज नेटवर्क ः तांत्रिक दर्जाच्या कीटकनाशकांच्या आयातीसाठी नोंदणी मंजूर करणाऱ्या अनियंत्रित आणि उदार नोंदणी धोरणामुळे भारतीय कीटकनाशक उत्पादन उद्योगाचे नुकसान होत आहे. त्यामुळे तांत्रिक दर्जाच्या कीटकनाशकांच्या आयातीवर निर्बंध घालण्याची मागणी पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरर्स अॅण्ड फॉर्म्युलेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच रसायने आणि खते मंत्रालयाला केली आहे.
पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरर्स अॅण्ड फॉर्म्युलेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या निवेदनानुसार, देशाकडे योग्य आणि पुरेशी उत्पादन क्षमता असूनही, आयातीसाठीच्या उदारमतवादी नोंदणी मंजूर करण्या धोरणामुळे भारतीय उद्योगांचे विशेषत: काही कीटकनाशकांच्या आयातीमुळे भारताकडे पुरेशी स्थानिक उत्पादन क्षमता असूनही अशा उद्योगांचे नुकसान होत आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप दवे यांनी दोन्ही संबंधित मंत्रालयांच्या सचिवांना, कृषी मंत्रालयाचे श्री. मनोज आहुजा आणि रसायने व खते मंत्रालयाचे श्री. अरुण बकोरा यांना तांत्रिक दर्जाच्या कीटकनाशकांच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी पत्र लिहिले आहे.
श्री. दवे यांनी मंत्रालयांना पाठवलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे, की मुख्य तांत्रिक उत्पादनांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी धोरण समर्थनाचा अभाव आहे. तयार केलेल्या उत्पादनांना अनुकूल आयात धोरण आहे. तांत्रिक दर्जाची कीटकनाशके आयात करण्यासाठी व्यापारी आणि आयातदारांना नोंदणी मंजूर करून उदार आयात नोंदणी व्यवस्था कार्यरत आहे. तांत्रिक दर्जाची उत्पादने स्वस्त आणि उपमानक स्त्रोतांकडून आयात केली जातात. नियामक अधिकारी बहुराष्ट्रीय कंपन्यांना फॉलो करत आहेत, जे भारताच्या संदर्भात लागू न होणारे धोरण ठरवतात.
श्री. दवे यांनी पुढे नमूद केले की, तांत्रिक दर्जाच्या कीटकनाशकांच्या स्थानिक निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करण्यात याव्यात. रसायने आणि खते मंत्रालय तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सीआयबी आणि आरसीच्या माध्यमातून जेथे पुरेशा उत्पादन क्षमता असतील, तेथे आयातीसाठी नोंदणी नाकारण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत.
रसायने आणि पेट्रोरसायन विभागाने 28 रासायनिक वस्तूंची यादी यापूर्वीच अधिसूचित केली आहे. ज्यासाठी पुरेशी स्थानिक क्षमता आणि स्थानिक स्पर्धा आहे. यादीमध्ये क्लोरपायरीफॉस, डी.डी.व्ही.पी., मोनोक्रोटोफॉस, फेनव्हॅलेरेट, सायपरमेथ्रिन, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन आणि ग्लायफोसेट अशी अनेक तांत्रिक दर्जाची उत्पादने आहेत.
या संवादाद्वारे सरकारने हे मान्य केले आहे, की पुरेशी उत्पादन क्षमता आहे, परंतु तरीही क्लोरपायरीफॉससारखी तांत्रिक दर्जाची उत्पादने TI v/sTIM श्रेणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केली जातात. या आयातीमुळे भारतातील तांत्रिक दर्जाच्या उत्पादनांच्या स्थानिक उत्पादनावरच परिणाम होत नाही, तर आवश्यक कच्चा माल आणि रसायने तयार करणार्या उद्योगांवरही परिणाम होतो, असे ते म्हणाले.