एटीएम न्यूज नेटवर्क : गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने महाराष्ट्रातील साखरवाडी उत्पादन केंद्रात एक नवीन विशेष बायो-केमिकल प्लांट उघडला आहे. या प्लांटमध्ये बायो-आधारित रसायने तयार करण्याचा कंपनीचा मानस आहे. या प्लांटचे उद्देश कोटिंग्ज आणि रेजिन, सौंदर्यप्रसाधने, फार्मास्युटिकल्स आणि अन्न आणि सुगंध बाजारासाठी जैव-आधारित रसायने तयार करणे हा आहे असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.
सोमय्या ग्रुप आणि गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष समीर सोमय्या हे म्हणाले कि “गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये आम्ही हरित रसायनशास्त्र वापरून नवीकरणीय संसाधनांपासून विशेष रसायने बनवतो. आमच्या बायो-आधारित रसायनांसाठी फीडस्टॉक म्हणून काम करणाऱ्या शाश्वत कृषी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करतो. या बहुउद्देशीय प्लांटमध्ये बायो-ब्युटानॉल, बायो-बेस्ड इथर आणि एस्टर यांसारखी बायो-केमिकल्स तयार करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता श्रीवास्तव म्हणाल्या कि आम्ही अनेक बाजारपेठांमध्ये नवीन बायो-आधारित केमिकल बिल्डिंग ब्लॉक्स विकसित आणि तयार करण्यासाठी आमच्या ग्राहकांशी सहकार्याने काम करतो. सह-निर्मितीमध्ये आम्ही संशोधन आणि विकासापासून प्रायोगिक स्तरावर नवीन जैव-आधारित रसायनांच्या व्यावसायिक प्रमाणात अनेक अनुप्रयोग आणि जैव उत्पादनांमध्ये कार्य करत असल्याचे त्या म्हणाल्या.
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडला साखर उद्योगात आठ दशकांहून अधिक काळ आणि जैव-आधारित रसायन उद्योगात सहा दशकांहून अधिक काळ अनुभव आहे, समुदाय आणि ग्राहकांच्या मूल्य साखळीसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी ऊस आणि इतर बायोमास पिकांमध्ये शेतकऱ्यांसोबत काम करते.