एटीएम न्यूज नेटवर्क : मेघमणी क्रॉप न्यूट्रिशन लिमिटेड (एमसीएनएल.) ही मेघमणी ऑरगॅनिक्स लि.ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे कि, जी पीक पोषण उत्पादनांच्या अग्रगण्य उत्पादकांपैकी एक बनण्याच्या उद्देशाने समाविष्ट केली आहे.
एमसीएनएलने देशांतर्गत विकसित केलेल्या पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया (लिक्विड) खत निर्मितीसाठी आघाडीच्या देशांतर्गत खत उत्पादक कंपनीसोबत परवाना करार केला आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी पन्नास दशलक्ष नॅनो युरिया बाटल्या (५०० मिली) क्षमतेसह गुजरातमध्ये एक नवीन कारखाना कार्यान्वित झाला आहे.
एमसीएनएल कंपनी २०२५ पर्यंत भारताचे युरिया आयातीवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी तसेच भारत सरकारचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल कारण अधिकाधिक शेतकरी नॅनो युरियाचा वापर करतात. याव्यतिरिक्त ते पारंपारिक युरियावरील भारत सरकारच्या अनुदानाचा भार कमी करण्यास मदत करेल.
नॅनो युरिया हे क्रांतिकारक द्रवरूप खत आहे आणि पौष्टिक गुणवत्तेमध्ये, पिकाची उत्पादकता वाढविण्यात प्रभावी आहे आणि याव्यतिरिक्त ते पर्यावरणास सुरक्षित आहे.
जागतिक स्तरावर पीक पोषणाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एमसीएनएल येत्या काही महिन्यांत पोषण विभागात आणखी उत्पादने आणणार आहे.