एटीएम न्यूज नेटवर्क : शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) च्या सक्षमीकरणासाठी डिझाइन केलेला भारतातील पहिला-एक्सीलरेटर कार्यक्रम कृषिकल्पा लाँच केला. या उपक्रमाला नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) द्वारे देखील पाठिंबा दिला गेला आहे, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट एफपीओचे शाश्वत ग्रामीण व्यवसायांमध्ये रूपांतर करणे आणि कृषी परिसंस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे.
बंगळुरू येथील जेपी नगरच्या आर व्ही डेंटल कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये कृषी क्षेत्रातील प्रमुख एफपीओ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात एफपीओ इकोसिस्टममधील उद्योजकता ओळखून शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि संसाधनांशी जोडण्यात एफपीओची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली. यावेळी कृषी सचिव श्री मनोज आहुजा, नाबार्डचे चेअरमन श्री शाजी के व्ही, विकास आयुक्त श्रीमती डॉ. शालिनी रजनीश (आयएएस) कर्नाटक सरकार यांनी अधिकृतपणे हा कार्यक्रम सुरू केला.
शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि संसाधनांशी जोडण्यात एफपीओची महत्त्वाची भूमिका आहे. अनेक एफपीओ उद्योजकीय कौशल्ये आणि ज्ञानाच्या अभावाने संघर्ष करतात त्यांची ही दरी दूर करून कृषिकल्पाचा प्रवेगक कार्यक्रम त्यांना एक दिशा देईल. एफपीओला मार्केट ओरिएंटेशन ट्रेनिंग देण्यात येईल. यात एफपीओला मार्केट प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि नेव्हिगेट करण्यासाठी सुसज्ज करणे हा हेतू असेल. व्यवसायाचे आउटपुट आणि इनपुट समजून एफपीओ सदस्य शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यावर लक्ष केंद्रित करणे, यशस्वी व्यवसाय म्हणून एफपीओ चालविण्यासाठी आवश्यक कौशल्ये तयार करणे.त्यात उद्योजकता तसेच नेतृत्व कौशल्ये यांचा अंतर्भाव असेल. कार्यक्षमता आणि नफा मिळवण्यासाठी एफपीओ ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करणे व पुरवठा साखळी व्यवस्थापन:करणे, एफपीओला ॲग्री-टेक स्टार्टअप्स, प्रोसेसर आणि नैतिक खरेदीदारांशी जोडणे म्हणजेच मार्केट लिंकेजचे ज्ञान देणे.
एफपीओसाठी तयार केलेला भारताचा पहिला-वहिला प्रवेगक कार्यक्रम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्याच्या दृष्टीने बनवला गेला आहे. अत्यावश्यक उद्योजकीय कौशल्ये आणि बाजार अंतर्दृष्टीने एफपीओचे सक्षमीकरण करून, कृषीकल्पाचे उद्दिष्ट शाश्वत आणि वाढीव ग्रामीण व्यवसायांच्या दिशेने परिवर्तन घडवून आणण्याचे आहे.
यावेळी कृषीकल्पाचे अध्यक्ष प्रशांत प्रकाश म्हणाले कि, कृषीकल्पाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनासह ग्रामीण विकासासाठी नाबार्डची वचनबद्धता हे सुनिश्चित करेल की आम्ही कृषी परिसंस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व पुढील पिढ्यांसाठी लवचिकता, समृद्धी आणि शाश्वतता वाढवण्यासाठी भर देण्यासाठी तयार आहोत.