एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी सेवा सुरू केल्याची घोषणा एफएमसी कॉर्पोरेशन या कृषी विज्ञान कंपनीने केली आहे.
भारतातील हवाई वाहतूक सेवांच्या नियमनाची जबाबदारी असलेल्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या ड्रोनसेवेला मंजुरी दिली आहे. ड्रोन सेवेमुळे शारीरिक श्रमाची गरज कमी होऊन शेतातील उत्पादकता सुधारण्यास मदत मिळणार आहे. सात प्रादेशिक भारतीय भाषांवर चालणाऱ्या एफएमसी इंडिया फार्मर अॅपद्वारे ड्रोन फवारणी सेवा सुरू केली जाऊ शकते. ही सेवा सध्या आंध्र प्रदेशमध्ये उपलब्ध आहे. महिन्याअखेरीस मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल.
एफएमसी इंडियाचे अध्यक्ष रवी अण्णावरपू म्हणाले, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास होत असताना 2030 च्या अखेरीस देशातील एकूण कृषी यंत्रसामग्रीच्या खर्चापैकी 2 टक्के ड्रोनचा वाटा अपेक्षित आहे. या प्रायोगिक टप्प्यात एफएमसी भारतीय शेतकऱ्यांसाठी ड्रोन अॅप्लिकेशनमध्ये जागतिक ज्ञान आणि कौशल्याचा लाभ घेतला जाईल. पहिल्या तीन महिन्यात निवडक राज्यांमधील भारतीय शेतकऱ्यांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याची योजना आहे. त्यानंतर पुढील खरीप हंगाम सुरू होण्याआधी देशभरातील शेतकर्यांपर्यंत सेवांचा विस्तार करू.
कृषी मानवरहित हवाई वाहने विचारात घेतलेले क्षेत्रावर एकसमान फवारणी करण्यास मदत करतात. तसेच हे ड्रोन एफएमसीचे कॉर्जन (Coragen®) आणि बेनिव्हिया (Benevia®) हे कीटकनाशकांच्या ब्रँड्सची फवारणी करताना अचूकतेत सुधारणा करतात. प्रत्येक फवारणी ड्रोन 15-20 मिनिटांत 3-4 एकरांवर फवारण्यास सक्षम आहे. त्यामुळे फवारणीचे काम सोपे आणि जलद होते. याचा वापर केल्यास उष्माघातासारख्या पर्यावरणीय जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल.
अण्णावरपू पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न नेहमीच असतात, जेणेकरून ते शाश्वत पद्धतीने उत्पादन वाढवू शकतील. ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी आम्ही ड्रोन तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा उपलब्ध करून देऊ. याव्यतिरिक्त तंत्रज्ञानासह शेतीचे आधुनिकीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. ड्रोन चालविण्याची आवश्यक कौशल्ये विकसित करताना अचूक शेतीचा व्यापक वापर सुनिश्चित होईल. भारतीय शेती बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आम्हाला विश्वास आहे, की कृषी पद्धती बदलण्यात ड्रोन सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. एफएमसी फार्मर अॅप आयओएस अॅपस्टोअर आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर या दोन्हीवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
(स्रोत ः agropages.com)