चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत 17.43 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात
एटीएम न्यूज नेटवर्क: चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरुवातीच्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालकानीं दिलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, एप्रिल-नोव्हेंबर 2022 दरम्यान कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) उत्पादनांची एकूण निर्यात अमेरिकन डॉलर्समध्ये 16 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 15.07 अब्ज अमेरिकन डॉलर्स वरून ती 17.43 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या नव्या योजनांमुळे चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत एकूण निर्यात उद्दिष्टांच्या 74 टक्के इतकी साध्य करण्यात मदत झाली आहे.
आकडेवारीनुसार, प्रक्रियायुक्त फळे आणि भाज्यांनी 32.60 टक्के (एप्रिल-नोव्हेंबर 2022) वाढ नोंदवली, तर ताज्या फळांनी मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत चार टक्के वाढ नोंदवली.
तसेच, कडधान्ये आणि विविध प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांमध्ये मागील वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांच्या तुलनेत 28.29 टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या आर्थिक वर्षातील याच महिन्यांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत डाळींच्या निर्यातीत 90.49 टक्के वाढ झाली आहे.
उत्पादने एप्रिल-नोव्हेंबर 2021 एप्रिल-नोव्हेंबर 2022 टक्केवारीत बदल
फळे आणि भाज्या 954 991 3.90
तृणधान्ये, प्रक्रिया केलेल्या वस्तू 2232 2863 28.29
मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि पोल्ट्री उत्पादने 2665 2709 1.65
बासमती तांदूळ 2063 2873 39.26
नॉन बासमती तांदूळ 3930 4109 4.57
इतर उत्पादने 3228 3890 17
एकूण 15072 17435 15.68