एटीएम न्यूज नेटवर्क : ऍडव्हंन्टा आणि युपीएलने हवामान व दुष्काळावर मात करण्यासाठी धान्य आणि चारा पीक व ज्वारीच्या वाणांसाठी यशस्वी पथदर्शी प्रकल्पांच्या मालिकेचे औपचारिक उद्घाटन केले आहे. झांबियातील अन्न आणि ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उष्णता आणि पाण्याच्या ताणावर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी झांबिया सरकारच्या प्रेसिडेंशियल डिलिव्हरी युनिटसोबत हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन झांबियाचे अध्यक्ष एच.ई. हाकाइंडे हिचीलेमा, कृषी मंत्री मा. रुबेन फिरी, ,युपीएल लि.चे चेअरमन आणि ग्रुप सीईओ जय श्रॉफ आणि ऍडव्हंन्टाचे आफ्रिका आणि मध्य पूर्वचे प्रादेशिक प्रमुख नदवी मुईआ, ऊर्जा मंत्रालयाचे प्रतिनिधीं, हरित अर्थव्यवस्था मंत्रालय प्रतिनिधी आणि झांबियन कृषी संशोधन संस्था (झारी) प्रतिनिधी उपस्थित होते.
सप्टेंबर २०२२ मध्ये अध्यक्ष हिचीलेमा यांच्याशी झालेल्या सुरुवातीच्या भेटीनंतर ऍडव्हंन्टा आणि युपीएलने अन्नधान्य आणि चारा ज्वारीच्या वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची क्षमता असल्याची इच्छा प्रदर्शित केली. मानव आणि प्राण्यांच्या वापरासाठी नवीन अन्न स्रोत म्हणून आणि नवीन फीडस्टॉक व बायो-इथेनॉल उत्पादन करण्यासाठी झारी संस्थेसोबत काम करण्याचे मान्य केले.
मका पिके आणि ऊस पिकांना पर्याय म्हणून या पिकांच्या वाणांची परिणामकारकता, उत्पादन आणि टिकाऊपणा दाखवण्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी पाऊस कमी झाल्याने आणि तापमान वाढल्यामुळे गेल्या १२ महिन्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवीन पीक वाणांची परिणामकारकता आणि सुलभता सुनिश्चित करण्यासाठी, झांबियातील पायलट माऊंट माकुलू संशोधन केंद्र, चिलंगा येथे अल्पभूधारक शेतीत आणि माझाबुका,दक्षिण प्रांतातील क्षेत्रामध्ये आयोजित केले गेले आहेत.
ऍडव्हंन्टा ग्लोबल सीईओ भूपेन दुबे म्हणाले कि, हवामान बदलाशी लढा देणारे बियाणे तंत्रज्ञान विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेऊन हवामानाच्या तणावावर मात करण्यासाठी पर्यायी पीक वाणांचा प्रयोग करत आहे. या प्रकल्पाचे यश हे केवळ झांबियासाठीच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेसाठी शाश्वत, लवचिक, अन्न आणि जैवइंधन आणि ऊर्जा सुरक्षा.उत्पादनाच्या नवीन रोडमॅपच्या दिशेने पहिले पाऊल आहे आणि हा व्यापक कृषी कार्यक्रम तयार करण्यासाठी आम्ही विश्वासू भागीदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
ऍडव्हंन्टाचे उप-प्रादेशिक प्रमुख नदवी मुईआ म्हणाले कि "झांबियाच्या ज्वारीच्या पिकांमध्ये वाढीव उत्पादकतेच्या संभाव्यतेमुळे आम्ही आनंदित झालो आहोत असून जे अन्नासाठी धान्य, पशुधनासाठी चारा आणि बायोइथेनॉल म्हणून औद्योगिक वापरासाठी वापरले जाऊ शकते.