एटीएम न्यूज नेटवर्क : 'कृषिथॉन' हे आंतरराष्टीय कृषी प्रदर्शन २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पार पडले. या प्रदर्शनात विविध श्रेणीत पुरस्कार, विविध चर्चासत्र, कार्यशाळा संपन्न झाल्या.
स्टार्टअप चर्चासत्र
कृषीक्षेत्रात स्टार्टअपचे महत्व, संधी आणि आव्हाने या विषयावर पॅनल पद्धतीने चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात श्री. रितेश पोपळघट (सीईओ, द फार्म), श्री. धिरज बोरडे (प्रवर्तक, मामा ड्रोन), श्री. दीपक नवघरे (संचालक, फलभूमी), श्री निखिल कुलकर्णी (जनरल मॅनेजर अँड हेड,नाशिक इंजिनियरिंग क्लस्टर), श्री.कमलेश एन घुमरे, के.जी.अॅग्रोटेक प्रा.लि,मालेगाव या वक्त्यांनी सहभाग घेतला. सर्व वक्त्यांनी कृषी क्षेत्रातील सोदाहरणासह स्टार्टअपचे महत्व, कृषी क्षेत्रातील स्टार्टअपच्या विविध संधी, स्टार्टअपची उभारणी करतांना येणारे आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. साहिल न्याहारकर यांनी केले. या चर्चासत्राचे संयोजन सत्र समन्वयक प्रा. तुषार उगले यांनी केले.
डाळिंब मार्गदर्शन सत्र
कृषीथॉन प्रदर्शनात डाळींब मार्गदर्शन सत्र आणि डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार वितरण संपन्न झाले. डाळिंब तज्ज्ञ श्री. बाबासाहेब गोरे यांनी डाळिंब उत्पादनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास नाशिक विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी, श्री. सुनील वानखेडे, ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशनचे विश्वस्त श्री. सतीश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कांदा व टोमॅटो पीक परिसंवाद
कृषीथॉन प्रदर्शनामध्ये कांदा व टोमॅटो पीक परिसंवाद पार पडला. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी पुरस्कार व टोमॅटो उत्पादक शेतकरी पुरस्कार वितरण करण्यात आले. कांदा व टोमॅटो पीक परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. शिवाजी नाना आवटे, बाजारभाव तज्ञ, पुणे, श्री. गणेश कदम, संचालक, सह्याद्री मोहाडी झोन, श्री. रोहित पोरे, बिजनेस मॅनेजर, सिजेंटा इंडिया लिमिटेड, श्री. विरेंद्र थोरात, विश्व हायटेक नर्सरी हे वक्ते म्हणून लाभले. कॅन बायोसिस तर्फे मातीचे आरोग्य व त्यामधील जीवाणुंचे महत्व या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. पुणे येथील कॅन बायोसिस कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार यांनी उपास्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी या विषयाच्या स्लाईड दाखवून मातीचे आरोग्य या विषयाची माहिती सांगितली.
द्राक्ष पीक परिसंवाद
कृषीथॉन प्रदर्शनात द्राक्ष पीक परिसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा नाशिकचे प्रकल्प संचालक श्री. अभिमन्यू काशीद हे उपस्थित होते. द्राक्ष पीक परिसंवादासाठी श्री. बाळासाहेब गडाख, (विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ), श्री.पंकज नाठे, (आर अँड डी हेड, सह्याद्री फार्म), श्री.अनंत (अन्नू दादा) मोरे (चेअरमन, फ्राटेली फ्रुट्स फार्मर प्रोड्युसर कंपनी), श्री. सुमित उगले (वरिष्ठ व्यवस्थापक, देहात), डॉ. युवराज पाटील, संचालक, न्यू केम सनरेशिया प्रा. लि. नाशिक, डॉ.संजय पांढरे.कार्यकारी संचालक, महाएफपीओ फेडरेशन अँड इ. कृषी (मार्केटिंग) हे वक्ते सहभागी झाले असून त्यांनी विविध प्रश्नाद्वारे द्राक्ष उत्पादकांचे शंका समाधान केले. या चर्चासत्रानंतर द्राक्ष उत्पादक शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले.