एटीएम न्यूज नेटवर्क : उन्नती ॲग्री जी एक कृषी पुरवठा साखळी आणि वित्तीय सेवा स्टार्टअप आणि भारतातील सर्वात मोठी कृषी कंपनी इफको कंपनीने ग्रामीण बाजारांना सक्षम करण्यासाठी धोरणात्मक टाय-अप केला. या धोरणात्मक टाय-अपचे उद्दिष्ट इफकोच्या चॅनल भागीदारांच्या विविध विभागांना चॅनल वित्तपुरवठा प्रदान करणे, त्यांना त्यांचे व्यवसाय कार्य वाढविण्यासाठी आणि त्यांच्या शेतकरी ग्राहकांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे असा आहे.
या भागीदारीअंतर्गत, उन्नती तिच्या एनबीएफसी भागीदारांच्या सहकार्याने चॅनल वित्तपुरवठा उपायांचा विस्तार करेल, ज्यात तिची उपकंपनी ओरा फायनान्ससह इफकोशी संबंधित भारतभरातील ७६,००० हून अधिक चॅनल भागीदारांना मदत होईल. या चॅनेल भागीदारांना आता क्रेडिट सुविधा उपलब्ध असतील ज्याचा उपयोग ते त्यांच्या व्यवसायाची क्षमता वाढवण्यासाठी करू शकतील. या क्रेडिट सुविधेचा लाभ घेऊन ते इफकोकडून मोठ्या प्रमाणात स्टॉक मिळवू शकतात. ज्यामुळे ते त्यांच्या शेतकरी ग्राहकांना योग्य वेळी योग्य दर्जाची उत्पादने पोहोचवू शकतात.
यावेळी उन्नतीचे सह-संस्थापक अशोक प्रसाद म्हणाले कि, “उन्नती येथे आमचे लक्ष नेहमीच देशभरातील शेतकऱ्यांना सर्वोत्तम डिजिटल-सक्षम सेवा प्रदान करण्यावर असते. यामुळेच आम्ही इफको सोबत त्यांच्या चॅनल भागीदारांच्या विस्तृत नेटवर्कला चॅनल वित्तपुरवठा उपाय प्रदान करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. नवीन टाय-अप या भागीदारांना, त्यांची पूर्ण क्षमता अनलॉक करण्यासाठी आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या वाढीस हातभार लावण्यासाठी सक्षम करेल.
या सहयोगाद्वारे देण्यात येणारी क्रेडिट सुविधा पूर्णपणे डिजिटल आहे आणि इफकोच्या ग्राहकांना अल्प मुदतीच्या क्रेडिटमध्ये सहज प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. हे डिजिटल प्लॅटफॉर्म चॅनल भागीदारांना क्रेडिट सुविधेसाठी अर्ज आणि व्यवस्थापित करण्यासाठी, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पेपरवर्क कमी करण्यासाठी एक अखंड आणि कार्यक्षम मार्ग सुनिश्चित करते.
इफकोचे मुख्य विपणन व्यवस्थापक रणजीश पांडे यांनी असे सांगून या सहकार्याबद्दल उत्साह व्यक्त केला की, “आम्ही इफको येथे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी, सागरिका आणि नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित खतांचा अवलंब करण्यासाठी शेतकरी आणि चॅनेल भागीदारांना पाठिंबा देण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. इतर नवीन जैव उत्पादने जे शेतीतील रासायनिक खते कमी करण्यास मदत करतील आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवतील आणि सुधारतील. उन्नतीने तिच्या एनबीएफसी. भागीदारांद्वारे प्रदान केलेली क्रेडिट सुविधा कृषीक्षेत्रात नॅनो खत गेम-चेंजर तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास मदत करेल.
हे केवळ किरकोळ विक्रेते आणि इफको चॅनल भागीदारांना इफकोच्या नॅनो खत आणि विशेष खत क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढविण्यास सक्षम करणार नाही तर नॅनो खताबद्दल शेतकऱ्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यात आम्हाला मदत करेल. आम्हाला वाटते की अशा संधी शेतकऱ्यांसाठी चांगल्या आहेत आणि आमच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाला मदत करतील. सुरुवातीला यूपी, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उन्नती ही फिनटेक-संचालित डिजिटल फार्मिंग कंपनी आहे. जी वितरक, किरकोळ विक्रेते, एफपीओ, शेतकरी आणि इतर कृषी भागधारकांना संपूर्ण देशभरातील पूर्ती भागीदारांच्या नेटवर्कद्वारे एंड-टू-एंड सपोर्ट ऑफर करते. डेटाद्वारे चालविलेले, प्लॅटफॉर्म वित्तीय सेवा, कृषी इनपुट विक्री आणि कृषी कमोडिटी मार्केट लिंकेज प्रदान करते. २०१७ मध्ये उन्नतीची स्थापना झाल्यापासून आठहुन अधिक राज्यांमध्ये कार्यरत आहे.