एटीएम न्यूज नेटवर्क : जगात फुटबॉलचा ज्वर अजूनही कायम आहे. २०२२ चा विश्वचषक पटकावल्यानंतर अर्जेंटिना फुटबॉल संघाचे चाहते वाढले आहेच, शिवाय संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या चाहत्यांची संख्याही वाढली आहे. मेस्सीच्या अशाच एका शेतकरी चाहत्याने कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मक्याच्या शेतात मेस्सीची प्रतिकृती साकारली आहे. एका सॉफ्टवेअरचा वापर करून टॅटूद्वारे ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
चार्ली फॅरिसेली असे मेस्सीच्या चाहत्याचे नाव असून, तो दक्षिण अमेरिकेच्या ब्यूनस आयर्सच्या वायव्येला सुमारे 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण बॅलेस्टेरोसमध्ये राहतो. फॅरिसेलीने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, गेल्या महिन्यात कतारमध्ये अर्जेंटिनाच्या निकालाची पर्वा न करता त्याने त्याच्या मक्याच्या शेतात मेस्सीच्या चेहऱ्याची प्रतिकृती साकारण्याची योजना आखली होती.
ही संकल्पना म्हणजे कृषी जगताकडून मेस्सीला दिलेली मानवंदना होती. अर्जेंटिना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जिंको अथवा पराभूत होवो, याची पर्वा केली नाही. परंतु मेस्सी जिंकला त्यासाठी देवाचे आभार" असे फॅरिसेली म्हणाले.
जवळजवळ चार फुटबॉल मैदानांचा आकार असलेल्या शेतात मेस्सीचा चेहरा फक्त वरील बाजूने दिसू शकतो. मक्याचे पीक वाढल्यानंतर तो अधिक ठळक दिसत जातो. हे एक कृषी 'टॅटू' आहे, असे फॅरिसेली म्हणाले.
फॅरिसेली म्हणाले की, इतर पिकांच्या रचनेच्या विरुद्ध जेथे प्रतिमा तयार करण्यासाठी झाडे तोडली जातात, पण तिथे लागवड केलेल्या बियांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा टॅटू आहे. बियाणांची पेरणी करताना कोणत्या ठिकाणी किती बिया पेरायच्या आहेत हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ट्रॅक्टरला ठाऊक होते.
फॅरिसेली यांनी इतर शेतकर्यांनी त्यांचे अनुकरण करण्यासाठी सोशल मीडियावर आमंत्रित केले आहे. त्यांना त्यांच्या उपकरणांमध्ये अपलोड करण्यासाठी सॉफ्टवेअर सामायिक केले आहे.
फॅरिसेली म्हणाले पाच वेगवेगळ्या प्रांतातील मक्याच्या शेतात मेस्सीचे 25 चेहरे आहेत. देशाच्या मध्यभागी अर्जेंटिनाच्या सुपीक पम्पास मैदानावर मोठा दुष्काळ पडला असून त्याचा परिणाम दिसत आहे. हे सांगताना फॅरिसेली म्हणाले, आम्ही राष्ट्रीय फुटबॉल संघामुळे ओळखले जातो. कारण जिंकण्यापूर्वी संघाला अनेक त्रासाचा सामना करावा लागला होता. आता कृषी क्षेत्रही त्रासाला सामोरे जात आहे.
(Photo: Reuters)