एटीएम न्यूज नेटवर्क : द्राक्ष बागायतदार संघाची वार्षिक मेळाव्याची परंपरा कौतुकास्पद आहे. यातून शेतकरी व तज्ज्ञ यामध्ये अभ्यासपूर्ण संवाद होतो. ९० टक्के द्राक्ष निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते. निर्यात वाढली पाहिजे. त्यासाठी अमेरिकेची बाजारपेठ हवी असल्यास केंद्राशी पत्रव्यवहार केला जाईल. बेदाण्याला जीएसटी सवलतीसाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत बोलत होते.
द्राक्षाला किफायतशीर फळपिकविमा देण्यासाठी कंपन्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. द्राक्षासाठी प्लास्टिक कव्हर योजना ५०० हेक्टरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत द्राक्षशेतीला चिकाटीने पुढे नेत आहेत. मात्र सरकारी मदत करतांना इतर पिकांच्या यादीत द्राक्षाचा विचार झाल्याचे दिसत नाही.त्यामुळे द्राक्षशेतीतील समस्यांचा आढावा व मदतीसाठी ३० ऑगस्टला राज्य शासनाकडून स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी कैलासराव भॊसले यांची निवड
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी सारोळे खुर्द येथील कैलासराव भॊसले तर उपाध्यक्षपदी सांगलीचे मारुती चव्हाण, खजिनदारपदी सोलापूरचे शिवाजी पवार व मध्यवर्ती विज्ञान समितीच्या चेअरमनपदी अभिजित कांचन यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत ही निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कैलास भोसले यांचा सत्कार व द्राक्षवाणाचे पेटंट मिळविणारे प्रयोगशील शेतकरी जयकर माने यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब गडाख व मानद सचिव म्हणून बबनराव भालेराव यांची निवड झाली. संचालक मंडळात वैभव तासकर, ऍड.रामनाथ शिंदे, वाल्मिक सांगळे, नंदू पडोळ , बाळासाहेब सानप, राजेंद्र भालेराव, मोतीराम जाधव, योगेश कुशारे, सुनील बाऱ्हाते, अशोक पाटील, बाळासाहेब आहेर, किशोर पानगव्हाणे, रावसाहेब भोसले, अशोक कांडेकर, गुलाब ठाकरे, महेश दवंगे, बाळू पगार, यशवंत ठुबे, कैलास पाटील, दत्तात्रय डावरे, भाऊसाहेब खर्डे, महेंद्र गुंजाळ, मनोज कोल्हे, मनीष चोपडे, अशोकराव वाघ, सुभाष वाघ, सागर सानप, शुभम गाडे, यादव कावळे, योगेश दवंगे यांची निवड झाली