एटीएम न्यूज नेटवर्क : देशांतर्गत बाजारपेठेत ट्रॅक्टरच्या विक्रीत जानेवारीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही वाढ सरासरी 15 टक्के आहे. सणासुदीच्या हंगामामुळे ट्रॅक्टर उत्पादकांना विक्री वाढण्यास मदत झाली. एस्कॉर्ट कुबोटने वार्षिक आधारावर विक्रीत 16 टक्के वाढ नोंदविली आहे. महिंद्रा ट्रॅक्टरच्या निर्यातीसह एकूण विक्रीत जानेवारी महिन्यात २८ टक्के वाढ झाली आहे.
देशाच्या आर्थिक विकासाची गणना करताना 50% पेक्षा अधिक मूल्य असलेल्या खाजगी क्षेत्राचे मूल्यांकन करण्यासाठी वाहन विक्रीचे आकडे लक्षपूर्वक पाहिले जातात. भारतातील महागाई कायम असून, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6% हून वरच्या पातळीवर राहिली आहे. परंतु अलीकडेच महागाई थोडी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ट्रॅक्टर जंक्शनच्या अहवालानुसार, महिंद्रा ट्रॅक्टर्स लिमिटेडने जानेवारी 2023 चा ट्रॅक्टर विक्री अहवाल प्रसिद्ध केला. जानेवारी 2023 मध्ये महिंद्राच्या ट्रॅक्टरची एकूण विक्री 28,926 युनिट्स होती. जानेवारी 2022 मध्ये तीच विक्री 22,682 युनिट्स होती. महिंद्रा ट्रॅक्टरच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार विक्रीत 28% वाढ झाली आहे.
महिंद्राची देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री जानेवारी 2023 मध्ये 27,626 युनिट्स होती. जानेवारी 2022 मध्ये ती 21,162 युनिट्स होती. देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीमध्ये 31% ची वाढ दर्शविण्यात आली आहे. महिंद्रा ट्रॅक्टरची निर्यात जानेवारी 2022 मध्ये 1520 युनिट्स होती. त्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये 1300 युनिट्स नोंदवली गेली. निर्यातीचा हा डेटा 14% ची घट दर्शवतो.
व्हीएसटी ट्रॅक्टरने अलीकडेच जानेवारी 2023 चा ट्रॅक्टर विक्री डेटा संकलित केला. या आघाडीच्या ट्रॅक्टर कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 600 ट्रॅक्टरची विक्री केली. तर जानेवारी 2022 मध्ये 468 युनिटची विक्री केली. शिवाय, व्हीएसटीने जानेवारी 2023 मध्ये 3706 पॉवर टिलरची विक्री केली, तर जानेवारी 2022 मध्ये 3178 पॉवर टिलरची विक्री केली.
एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड अॅग्री मशिनरीजने जानेवारी 2022 मध्ये 6,649 ट्रॅक्टर विक्री केले. जानेवारी 2023 मध्ये 5,707 ट्रॅक्टर विक्री झाले. ही घट 16.5% होती. जानेवारी 2022 मध्ये कुबोटाची 5,103 ट्रॅक्टर्स विक्री झाले. जानेवारी 2023 मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री 6,235 ट्रॅक्टर विक्री झाले. एस्कॉर्ट्स कुबोटाच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री डेटामध्ये 22.2% वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये 414 ट्रॅक्टर्सची निर्यात झाली. त्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये 604 ट्रॅक्टरची निर्यात झाली. ही निर्यात 31.5% ची घसरण दर्शवणारी आहे.