एटीएम न्यूज नेटवर्क: सीएनएच इंडस्ट्रियल इंडियाने शेतातील पेंढ्याचे व्यवस्थापन तंत्राचा वापर करून नवा उपाय सादर केला आहे. शेतीला अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवून जगातील शेतकऱ्यांसोबत भारतातील शेतकऱ्यांनी उभे राहण्यासाठी सीएनएच इंडस्ट्रियल इंडियाने स्ट्रॉ व्यवस्थापन तंत्राचा वापर सुरू केला आहे.
सीएनएच इंडस्ट्रियल इंडियाच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी विभागाच्या प्रमुख कविता साह सांगतात, 'अॅग्रीकल्चर' या शब्दामध्ये आपसूकच 'कल्चर' हा शब्द आलेला आहे. शेतातील पेंढा जाळून बहुतांश शेतकरी त्याची विल्हेवाट लावतात. परंतु त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेता मोठ्या सांस्कृतिक बदलाची गरज आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या वेबिसोड मालिकेबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
सीएनएच इंडस्ट्रियलने केंद्रीय कृषी मंत्रालयासोबत भागीदारी करून 2016 मध्ये पेंढा व्यवस्थाप तंत्राचा प्रयोग करण्यासाठी भारतातील पंजाबमधील कल्लर माजरी या गावाची निवड केली होती. या तंत्राचा वापर केल्यामुळे पहिल्या वर्षात तेथील जमिनीचा सर्व भुसभुशीतपणा दूर झाला. शेतकऱ्यांनी काडी-कचरा जाळण्याची प्रथा बंद केल्यावर त्यांना त्वरित फायदे समजले. तसेच प्रदूषण कमी झाले, उत्पादनही वाढले. तसेच शेतकऱ्यांनी या पेंढ्या वीज संयंत्रांना विकून नवीन उत्पन्न मिळविले.
वेबिसोड प्रकल्पात सहभागी असलेल्या काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पेंढा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करताना त्यांना अनेक आव्हानांवर मात करावी लागल्याचे ते सांगतात. यावरून इतर शेतकरी त्यांच्या या मार्गाचा अवलंब करतील अशी त्यांची आशा आहे. सीएनएच इंडस्ट्रियल इंडियाने सुरू केलेल्या या प्रयोगाच्या सुरुवातीच्या यशानंतर हा उपक्रम आणखी दहा ठिकाणी सुरू करण्यात आला असून, आणखी आठ ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे.