एटीएम न्यूज नेटवर्क : बायोलेव्हल लि.ही एक जागतिक दर्जाची जैविक पोषण बनवणारी कंपनी आहे. जी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या नवीन पिढीचा विकास आणि वितरण करण्यासाठी समर्पित आहे. गहू आणि बार्लीसाठी बायोलेव्हलने ग्रामेक्सएनपी (GramaxNP™) हे लिक्विड खत बाजारात आणले आहे.
ग्रामेक्सएनपी हे ग्राउंडब्रेकिंग बायोफर्टिलायझर आहे. जे वेळेची तडजोड न करता आणि वापरण्यास सोपे असून अपेक्षित उत्पादन वाढवते. गहू आणि बार्ली उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा योग्य उपाय आहे. बाजारातील इतर उपलब्ध जैविक उत्पादनांना वापरण्यापूर्वी अनेक पायऱ्या आवश्यक असतात. जसे की इतर घटक मिसळणे परंतु ग्रामेक्सएनपी हे असे पहिले उत्पादन आहे कि ते वापरण्यास तयार आहे, ते द्रव स्वरूपात स्थिर असून त्याला रेफ्रिजरेशनची आवश्यकता नाही. आणि लांब शेल्फ लाइफ आहे. याव्यतिरिक्त ग्रामेक्सएनपीचे हलके बियाणे कोटिंग इतर द्रव बियाणे उपचारांमध्ये चांगले मिसळण्यास अनुमती देते.
"सोय आणि वापरात सुलभता हे आमच्या उत्पादनाच्या नावीन्यपूर्णतेच्या अग्रस्थानी आहे. ग्रामेक्सएनपीचे सूक्ष्मजीव द्रव बियाण्यांचे लेप एकत्रित करून त्यांचे उत्पादन वाढवण्यास सक्षम आहेत. असे बायोलेव्हल लि.चे अध्यक्ष आणि सह-संस्थापक लुट्झ ग्लानडॉर्फ यांनी सांगितले. २०२३ च्या हंगामात ग्रामेक्सएनपीने हिवाळा आणि वसंतऋतू मध्ये पेरणी केलेल्या गहू आणि बार्ली या दोन्ही पिकांमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी केली. या उत्पादनाने दर्जेदार अतिरिक्त उत्पन्न दिले आणि धान्याचा उच्च दर्जा राखून उत्पादनात वाढ झाली असल्याचेही ग्लानडॉर्फ म्हणाले.
बायोलेव्हलचे ब्रँड उत्पादने विशिष्ट पिकांना अधिक संतुलित पोषण सुसंगतपणे आणि सोयीस्करपणे देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. हे उत्पादने नैसर्गिक सूक्ष्मजंतूंच्या मजबूत संघटनवर आधारित आहेत. जी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे विद्राव्यीकरण करतात आणि वनस्पतीच्या मुळाशी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या शोषणास प्रोत्साहन देतात. पर्यावरणपूरक असलेली ही उत्पदनांना दोन वर्षांची शेल्फ लाइफ आहे आणि त्यांना रेफ्रिजरेशन किंवा अतिरिक्त किण्वनची आवश्यक नाही. त्यामुळे ते बाजारात वापरण्यास सर्वात सोयीस्कर आहेत. बायोलेव्हल उत्पादने हरितगृह शेतीतून वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी सिद्ध, सुरक्षित आणि विश्वासार्ह योगदान देतात.