एटीएम न्यूज नेटवर्क : ॲग्रोकेमिकल उद्योगातील 'पेटंट पॉवर'साठी ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेड (बीएएल) या भारतातील खास आणि पेटंट ॲग्रोकेमिकल्सच्या आघाडीची उत्पादक कंपनीने या वर्षी 'शॉट डाउन' नंतर 'वॉर्डन एक्स्ट्रा' हे तिसरे पेटंट मिळविले.
वॉर्डन एक्स्ट्रा हे एक अतुलनीय बियाणे ड्रेसिंग एजंट आणि कीटकनाशक आहे. जे विशेषतः सोयाबीन आणि भुईमूग पिकांसाठी डिझाइन केलेले आहे. बेस्ट ॲग्रोलाईफ ग्रुपकडे आता १० पेटंट्सचा प्रभावशाली पोर्टफोलिओ आहे, ज्यामुळे ॲग्रोकेमिकल सेगमेंटमधील नावीन्यपूर्ण पॉवरहाऊस म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा शेंगदाण्याचा उत्पादक, प्रक्रिया करणारा आणि निर्यात करणारा देश आहे. ज्याचा जागतिक उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के वाटा आहे. सोयाबीन उत्पादनात भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. अंदाजे १,२०० कोटी रुपयांच्या अंदाजे वार्षिक व्यवसाय क्षमतेसह वॉर्डन एक्स्ट्रा संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा सुमारे ७५% व्यवसाय गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून येण्याची अपेक्षा आहे.
वॉर्डन एक्स्ट्रा हे ग्राउंडब्रेकिंग टर्नरी कॉम्बिनेशनचे प्रतिनिधित्व करते, जे ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन, थायामेथोक्सम आणि थिओफॅनेट मिथाइलचे सिनेर्जिस्टिक प्रभाव वापरून रोग आणि कीटकांपासून पिकाचे सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते.