एटीएम न्यूज नेटवर्क : कमी यांत्रिकीकरणामुळे भारतातील शेती संकटात आहे. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. शेती उपकरणे बनवणारी बलवान कृषी, ही कंपनी समस्या बदलू इच्छित असल्याचे बलवान कृषीचे सह-संस्थापक रोहित बजाज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, भारतातील कृषी यांत्रिकीकरण सुमारे ४० ते ४५ टक्के आहे, ज्यामध्ये जमीन तयार करणे आणि मळणी यांसारख्या पीक चक्राच्या काही विशिष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये लक्षणीय ९० टक्के वाटा आहे. याखेरीज बियाणे, फवारणी, सिंचन आणि आंतरमशागत तण यांसारख्या मध्यवर्ती पायऱ्यांमध्ये मोठ्या यंत्रांद्वारे, विशेषत: लहान शेतात आणि डोंगराळ प्रदेशांवरील आव्हानांमुळे केवळ कमीतकमी यांत्रिकीकरण दिसत असल्याचे ते म्हणाले.
मी तिसऱ्या पिढीतील उद्योजक आहे आणि माझ्या कुटुंबाचा वारसा असलेला व्यवसाय लोह आणि पोलाद उद्योगात आहे. पण मला नवीन मार्ग तयार करायचा आहे. २०१६ मध्ये मी एका नवीन ट्रॅक्टरच्या लॉन्च कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना मला एक समस्या लक्षात आली. बहुतेक शेतकरी शेती यंत्रे घेण्यास उत्सुक होते, परंतु ट्रॅक्टरच्या उच्च किंमतीमुळे त्यांना एक महत्त्वपूर्ण अडथळा निर्माण झाला. संभाव्य व्यावसायिक संधी ओळखून आणि अंतर्निहित उद्योजकीय भावनेने प्रेरित होऊन या समस्येवर उत्तर काढण्याची कल्पना माझ्या मनात रुजली असल्याचे श्री. रोहित बजाज यांनी सांगितले.
भारतातील ८५% शेतकरी लहान आणि अल्पभूधारक आहेत. त्यांना महागडी उपकरणे परवडत नाहीत, हे समजून घेऊन मी माझा चुलतभाऊ शुभम बजाज यांच्याशी हातमिळवणी केली. आता बलवान कृषीचे उद्दिष्ट भारतातील लहान आणि सीमांत शेतकर्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे आहे. मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेती धोक्यात आली आहे. यामुळे आमची उपकरणे मजूर-केंद्रित क्रियाकलाप कमी करण्यासाठी, शेती पद्धती सुधारण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आणि आर्थिक दबाव कमी करण्यासाठी डिझाइन केलेली असल्याचे रोहित बजाज यांनी सांगितले.
जयपूरमधील आमचे उत्पादन केंद्रात महिला शेतकरीही हाताळू शकतील अशी कमी वजनाची उपकरणे तयार करण्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले. कंपनीने "अर्थ ऑगर्स" आणि "मिनी ट्रेलर" सादर केले आहेत. त्यांच्या उत्पादन श्रेणीत पाण्याचे पंप, स्प्रेअर, तणनाशक, टिलर, कापणी उपकरणे आणि बरेच काही उपकरणे समाविष्ट आहेत. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळून विक्रेत्यांकडून सदर उपकरणांचा पुरवठा सक्रियपणे वाढवत असल्याचे रोहित बजाज यांनी स्पष्ट केले. सदर उत्पादने केवळ उत्पादन परिसंस्था मजबूत करत नाही, तर व्यापक भारतीय उत्पादनक्षेत्राच्या वाढीसाठी आणि टिकाऊपणामध्ये योगदान देते.