एटीएम न्यूज नेटवर्क : अधिक कृषी संबंधित अभ्यासात करिअर करत आहेत. हे पाहून आनंद वाटतो. मला खात्री आहे की या विकासामुळे भारतातील शेतीचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात आहे. कृषी विद्यापीठातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थी मुली आहेत असे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी केले. त्यांच्या हस्ते ‘महिला कृषी उद्योजकता क्षेत्र परिषद २०२४’ चे उद्घाटन करण्यात आले.
केरळ कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने वेल्लानिकारा येथे शनिवारी आयोजित ‘महिला कृषी उद्योजकता क्षेत्र परिषद २०२४’ चे उद्घाटनात मंत्री करंदलाजे बोलत होत्या. महिला समाजाचा कणा असून देशाला पुढे नेण्यासाठी त्यांनी पुरुषांसोबत मिळून काम केले पाहिजे, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केले.
सुश्री करंदलाजे म्हणाल्या की, "ही अभिमानाची बाब आहे की भारतातील कृषी विद्यापीठांमध्ये निम्म्याहून अधिक विद्यार्थी मुली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्राने कृषी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटींची तरतूद केली होती, त्या पुढे म्हणाल्या की राज्य सरकारने ही रक्कम सर्व जिल्ह्यांमध्ये शीतगृहे आणि अन्न चाचणी प्रयोगशाळा यासारख्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी वापरल्या पाहिजेत.आणि कृषी उत्पादने निर्यात केली पाहिजे