एटीएम न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रस्तावित विधेयक कायदा क्र. ४० ते ४४ मध्ये बि बियाणे, रा. खते, किटकनाशके विक्रेत्यांवर जाचक अटी लादल्या आहेत.सदर कायद्याचा विरोध म्हणून दि. २ ते ४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरातील कृषी विक्रेते दुकाने बंद तसेच विक्री बंद ठेवणार आहेत. या लाक्षणीक बंदला नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेते दि. २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आपली दुकाने बंद ठेऊन पाठींबा देणार आहेत.
अशी माहिती नाशिक ऍग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.विजय पाटील,उपाध्यक्ष श्री.अरुण मुळाणे, लक्ष्मीकांत जगताप, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, रामभाऊ जाधव, संतोष पाटील, महेंद्र सानप, महेंद्रशेठ बोरा, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब कवडे, दिनेश मुंदडा, संजय जाधव इ. माहिती दिली.
यावेळी नाडाचे उपाध्यक्ष श्री.अरुण मुळाणे यांनी सांगितले कि, "महाराष्ट्रातील कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी हा बंद प्रस्तावित विधेयकाच्या जाचक नियमांच्या विरुद्ध पुकारला आहे.नाशिकमधील निविष्ठा विक्रेते व डीलर्सने. नाशिक ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. या कायद्यामुळे या निविष्ठा विक्री व्यवसायातील चांगले व्यावसायिक या प्रक्रियेतून बाहेर पडतील व अनिष्ट प्रवृत्तीच्या हातात हा व्यवसाय जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. हा बंद लाक्षणिक स्वरूपाचा असेल व यानंतर सरकारशी चर्चा झाल्यावर पुढची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे श्री. मुळाणे यांनी सांगितले.
या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोशिएशन (माफदा) यांनी वेळोवेळी मा कृषी सचिव, कृषी आयुक्त तसेच कृषी मंत्री मा धनंजय मुंडे यांनाही निवेदन व मिटींग घेऊन सदर अन्यायकारक कायद्यातील जाचक नियमांमुळे होणारे संभाव्य नुकसान व धोके व संपूर्ण व्यापारावर होणारे विपरीत परिणाम व त्यातुनच एकंदरीत शेतकरी बांधवांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली गेली.
यावर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे सदर ३ दिवसांच्या बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोशियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री तसेच राज्य अध्यक्ष विनोद तराळ पाटील, राज्य सचिव विपिन कासलीवाल यांनी दिली.