एटीएम न्यूज नेटवर्क : महिको समूहाची उपकंपनी असलेल्या सेव्हन स्टार फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेडने अलीकडेच दिल्लीच्या गजबजलेल्या आझादपूर मंडईमध्ये आपल्या नवीन सुविधेचे उद्घाटन केले, जे ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे उत्पादन देण्याच्या वचनबद्धतेचे संकेत देते.
या कार्यक्रमाला संजय देशपांडे, अमित भारद्वाज, आशिष श्रीवास्तव, वैभव अग्रवाल, वेदप्रकाश सिंग आणि राज सिंग यांसारख्या नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. १९९२ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांचे पालन केल्यामुळे कंपनी ताज्या उत्पादन निर्यात क्षेत्रात एक अग्रगण्य नाव बनली आहे आणि आता देशांतर्गत बाजारपेठेत प्रमुख किरकोळ साखळी आणि रोपवाटिका आणि लागवड साहित्य व्यवसायात सहभागी होण्यासाठी कंपनीने कार्याचा विस्तार केला आहे.
भारतीय शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सफरचंद लागवडीतील आव्हानांना तोंड देत सेव्हन स्टार फ्रूट्स देशभर सफरचंद उत्पादकता सुधारण्यासाठी प्रगत बागायती तंत्रज्ञान सादर करत आहे.
कंपनीच्या धोरणामध्ये सफरचंदाची मूल्य शृंखला वाढविण्यासाठी प्रयज्ञ सुरु आहे, आधुनिक रोपवाटिकांची स्थापना, कोल्ड चेन पायाभूत सुविधांचा विकास आणि शेतकऱ्यांचा नफा वाढविण्यासाठी स्टोरेज, वाहतूक, ग्रेडिंग आणि मार्केटिंगमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे.
सेव्हन स्टार फ्रुट्सने भारतामध्ये जिनिव्हा ऍपल रूटस्टॉक्सचा प्रचार करण्याचे विशेष अधिकार प्राप्त केले आहेत, जे कृषी क्षेत्रातील नाविन्य आणि टिकाऊपणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाते.