एटीएम न्यूज नेटवर्क : देशातील शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती, सेवा आणि सुविधांनी सुसज्ज करून सक्षम बनवण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी नुकतेच राष्ट्रीय कृषी भवनात कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले, "देशभरातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे."
हे कमांड सेंटर कृषी क्षेत्रात मंत्रालयाकडून करण्यात येत असलेल्या सर्व डिजिटल नवकल्पनांना मोठ्या स्क्रीनवर दाखवेल.