एटीएम न्यूज नेटवर्क ः कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी वर्ष 2022-23 साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचे दुसरे आगाऊ अंदाज जाहीर केले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, चालू कृषी वर्षात 3235.54 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे.
आगाऊ अंदाजानुसार, भरड धान्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीची प्रशंसा करून, तोमर यांनी आशा व्यक्त केली की येत्या काही वर्षांमध्ये भरड धान्य/पौष्टिक धान्यांचे उत्पादन आणि वापरात आणखी वाढ होईल. दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2022-23 साठी प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे:
अन्नधान्य - 3235.54 लाख टन (विक्रमी)
तांदूळ - 1308.37 लाख टन (विक्रमी)
गहू - 1121.82 लाख टन (विक्रमी)
पोषक / भरड तृणधान्ये - 527.26 लाख टन
मका - 346.13 लाख टन (विक्रमी)
बार्ली - 22.04 लाख टन (विक्रमी)
एकूण कडधान्ये - 278.10 लाख टन. (विक्रमी)
हरभरा - 136.32 लाख टन. (विक्रमी)
मूग - 35.45 लाख टन. (विक्रमी)
तेलबिया - 400.01 लाख टन. (विक्रमी)
भुईमूग - 100.56 लाख टन.
सोयाबीन - 139.75 लाख टन.
रेपसीड आणि मोहरी - 128.18 लाख टन. (विक्रमी)
कापूस - 337.23 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो)
ऊस – 4687.89 लाख टन (विक्रमी)
ज्यूट आणि मेस्ता – 100.49 लाख गाठी (प्रत्येकी 180 किलो)
देशात एकूण अन्नधान्याचे 3235.54 लाख टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, तो मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 79.38 एलएमटी ने जास्त आहे. वर्ष 2022-23 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन 1308.37 लाख टन होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन 13.65 लाख टनांनी अधिक आहे. विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज हा वर्ष 2022-23 मधील दुसऱ्या अग्रिम अंदाजानुसार वर्तवला आहे. 2012-13 या वर्षापासून पुढील काळातील तुलनात्मक अंदाज सोबत जोडण्यात आले आहेत.
(स्रोत ः पीआयबी)