एटीएम न्यूज नेटवर्क : एफएमसीजी कंपनी सर्वेश्वर फूड्सने जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या आणि उत्पादन क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रमाणित सोना मसुरी भात बियाण्याचे मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे.
सोना मसुरी तांदळाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची चव आणि मसाले सहजपणे शोषून घेण्याची क्षमता आहे. यामुळे ते विविध भारतीय पदार्थ तयार करण्यासाठी एक आदर्श घटक म्हणून त्याचा उपयोग होतो. या कार्यक्रमांतर्गत सर्वेश्वर खरेदी सुविधा केंद्रात सोना मसुरी धानाच्या प्रमाणित बियाण्याचे मोफत वाटप केले जाईल असे कंपनीने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
सोना मसुरी भात हा मुख्यतः दक्षिण भारतात पिकवल्या जाणाऱ्या मध्यम धान्याच्या तांदळाचा एक प्रकार आहे. या जातीत तांदळाच्या इतर जातींच्या तुलनेत कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते आरोग्यदायी पर्याय आहे. सोना मसुरी तांदुळाच्या वाढत्या उपयोगितेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील त्याचे महत्वाचे स्थान आहे, या जातीची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार मोफत वितरणाचा लाभ कठुआ सेक्टरमध्ये परागवाल, मीरपूर, गारखल, अखनूर पूर्व, पंजतूत, खौर, जौरियन, बकौर, अखनूर पश्चिमेतील हमीरपूर आणि पहारपूर, महाराजपूर, हरिपूर, चडवाल, हरियाचक यासह विविध क्षेत्रांतील सुमारे १००० शेतकऱ्यांना होईल.