एटीएम न्यूज नेटवर्क : शेतमाल हमीभाव खरेदीसाठी व अन्य प्रयोजनार्थ राज्यस्तरीय नोडल संस्था म्हणून 'महाफेड अॅग्रो'ला मान्यता मिळाली आहे. पणन खात्याने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वागत केले आहे.
दरवर्षी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार 'नाफेड' मार्फत खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येते. किमान आधारभूत खरेदी योजनेतंर्गत कडधान्ये (मूग, उडीद, तूर व हरभरा) व तेलबिया (सोयाबीन) तसेच कांदा, कापूस व इतर शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी स्टेट नोडल एजन्सी नियुक्ती करण्यात येत असते. यावर्षी एफ.पी.सी. फेडरेशनला ( महाफेड ऍग्रो फार्मर्स कंपनी ली. पुणे ) ही संधी मिळाली.
महाफेड एफपीसी ही संस्था शेतकरी, शेतकरी गट, युवक, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याबरोबर शेती माल खरेदी विक्रीचे व इतर कृषी प्रकल्प राबवण्याचे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे बळकटीकरण करण्याचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थापन केली आहे.