एटीएम न्यूज नेटवर्क : भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) इंदूर येथील प्रमुख वैज्ञानिक (वनस्पती प्रजनन) डॉ जंग बहादूर सिंग यांनी 'पुसा गौरव' ही डुरम गव्हाची जात विकसित केली.
नव्याने लाँच करण्यात आलेली पुसा गौरव अशा प्रकारे विकसित केली गेली आहे की ती चांगल्या प्रतीच्या चपात्या व पास्ता बनवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पुसा गौरव (एचआय 8840) ही जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राष्ट्राला समर्पित केलेल्या १०० हवामान-प्रतिरोधक वाणाच्या पिकांपैकी एक आहे.
'पुसा गौरव' गव्हाची जातीची वैशिष्ट्य :
डुरम गव्हाला बोलचालीत "मालवी" किंवा "काठिया" गहू म्हणतात आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याचे दाणे सामान्य गव्हाच्या वाणांपेक्षा कडक असतात.
पास्ता, रवा आणि दलिया तयार करण्यासाठी आदर्श असलेल्या डुरम गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.