एटीएम न्यूज नेटवर्क : नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने गुजरातमध्ये चिकन समोसा, पॅटीज आणि मोमोज यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी मांस आणि अंडी प्रक्रिया युनिट्सची स्थापना करण्याचे सुचवले आहे.
२०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या स्टेट फोकस पेपरनुसार गेल्या दोन वर्षांपासून गुजरातमध्ये मांसाचे उत्पादन ०.३५ लाख किलोग्रॅमवर स्थिरावले असल्याचेही या पेपरने ठळकपणे नमूद केले आहे.
नाबार्डने शेळी आणि मेंढ्यांसाठी प्रजनन पायाभूत सुविधा वाढविण्याची आणि ग्रामीण स्तरावर पोल्ट्री क्षेत्राचा विकास करण्यासाठी कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.
पेपरने २०२४-२५ साठी गुजरातमधील प्राधान्य क्षेत्रासाठी १८% वाढीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यात १.८ लाख कोटी एमएसएमईसाठी, १. ४२ लाख कोटी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी आणि उर्वरित इतर प्राधान्य क्षेत्रांसाठी वाटप करण्यात आले आहेत. २०२२-२३ मध्ये गुजरातमधील अंडी उत्पादनात ३.६% ची किरकोळ घट झाली, त्या कालावधीत राज्याने १८.७८९ लाख अंडी उत्पादन केले.