एटीएम न्यूज नेटवर्क: कीटकनाशक बनविणाऱ्या क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडने तांदूळ उत्पादकांसाठी मेंटॉर हे नवीन बुरशीनाशक लाँच केले आहे. हे उत्पादन केवळ करपा रोगावर नियंत्रण ठेवत असे नाही, तर भातपिकाचे एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे उच्च आणि दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये मेंटॉरची चाचणी घेण्यात आली. शेतकऱ्यांसह विविध भात उत्पादक बाजारपेठांमध्ये 1,000 हून अधिक प्रात्यक्षिके घेण्यात आली. भातपिकावर पडणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी मेंटॉर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी. एस. शुक्ला म्हणाले, भात हे केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर देशाच्या अन्नसुरक्षेसाठीही सर्वात महत्त्वाचे पीक आहे. भात पिकासाठी एक शक्तिशाली आणि नवीन R&D आधारित बुरशीनाशक मेंटॉर लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा इत्यादी ठिकाणी असलेल्या तांदूळ उत्पादक भागात क्रिस्टल क्रॉपला अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यास मेंटॉर मदत करेल. हे उत्पादन चालू रब्बी हंगामासाठी त्वरित उपलब्ध होईल.
क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडच्या विक्री विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अजित शंखधर म्हणाले, आम्ही हे नवीन उत्पादन भारतीय शेतकर्यांना समर्पित करत आहोत. या उत्पादनामुळे कंपनीला केवळ अधिक बाजारपेठ मिळण्यास मदत होणार नाही, तर भात मूल्य शृंखलेतील प्रमुख भागधारकांसाठी अधिक नफाही सुनिश्चित करेल.