एटीएम न्यूज नेटवर्क ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रीमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी वाढ करून ७००० रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. मूग डाळीच्या एमएसपीत प्रतिक्विंटल ८०३ रुपयांनी वाढ करून ८५५८ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये प्रतिक्विंटल ३५० रुपयांनी वाढ करून ६९५० रुपये प्रतिक्विंटल वाढ, मक्याच्या एमएसपीत प्रतिक्विंटल १२८ रुपयांनी वाढ करून २०९० रुपये प्रतिक्विंटल वाढ, भुईमुगाच्या एमएसपीत प्रतिक्विंटल ५२७ रुपये प्रतिक्विंटल वाढ करून ६३७७ रुपये प्रतिक्विंटल वाढ, संकरित ज्वारीच्या एमएसपीत २१० रुपये प्रतिक्विंटल वाढ करून ३१८० रुपये प्रतिक्विंटल वाढ, मालदांडी ज्वारीच्या एमएसपीत २३५ रुपये प्रतिक्विंटल वाढ करून ३२२५ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. बाजरीच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल १५० रुपयांनी वाढ करून २५०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
नाचणीच्या एमएसपीमध्ये २६८ रुपये प्रतिक्विंटल वाढ करून ३८४६ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. सामान्य भाताच्या एमएसपीत १४३ रुपये प्रतिक्विंटल वाढ करून २१८३ रुपये प्रतिक्विंटल वाढ, भात अ श्रेणीच्या एमएसपीत १४३ रुपये प्रतिक्विंटलने वाढ करून २२०३ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
सूर्यफूल बियांच्या एमएसपीमध्ये ३६० रुपये प्रतिक्विंटल वाढ करून ६७६० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. तसेच सोयाबीन (पिवळे) ची एमएसपी प्रतिक्विंटल ४६०० रुपये, तीळ ८६३५ रुपये प्रतिक्विंटल, कारळे ७७३४ रुपये, कापूस (मध्यम धागा) ६६२० रुपये आणि कापूस (लांब धागा) ७०२० रुपये प्रतिक्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत करण्यात आली आहे.
यात ज्या खर्चाचा संदर्भ देण्यात आला आहे, त्यात मानवी मजुरी , बैलांची मजुरी /यंत्र मजुरी, भाडेतत्वावर घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते , अवजारे यावरील खर्च , सिंचन शुल्क, आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालवण्यासाठी डिझेल/वीज इ.,विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे मूल्य.यासाठीचे सर्व देय खर्च समाविष्ट असतात.