एटीएम न्यूज नेटवर्क : एकीकृत लॉजिस्टिक्स सेवा पुरवणारी भारतातील एक सर्वात मोठी कंपनी महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडने (एमएलएल) एक लाख चौरस फुटांच्या वेयरहाऊसचे नुकतेच उद्घाटन केले. अनेक वेगवेगळ्या ग्राहकांना सेवा पुरवण्याच्या क्षमता, नूतनीकरणीय ऊर्जा, संसाधनांचे संवर्धन आणि हरित कव्हर यांचा समावेश असलेल्या पर्यावरणपूरक वेयरहाऊसिंग वास्तुकलेच्या साहाय्याने याची रचना करण्यात आली आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या दुसऱ्या वेअरहाऊसचे उद्घाटनही बेळगाव ढगा येथे झाले.हे वेअरहाऊस ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणूनही प्रमाणित झाले आहे.
तर शेकडो कोटींची गुंतवणूक करत तिसऱ्या सर्वात मोठ्या वेअरहाऊस प्रकल्पाचे वासाळी शिवारात भूमीपूजन प्रजासत्ताकदिनी महिंद्रा लॉजिस्टिकसचे एम.डी. व सी.ई.ओ रामप्रवीण स्वामिनाथन यांच्या हस्ते झाले यावेळी महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनय खानोलकर, महिंद्रा लॉजिस्टिकसचे उपाध्यक्ष राजेश शेट्टी, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी अशोक बोरसे, निंबा पाटील आदी उपस्थित होते. स्वागत जे के वेअरहाऊसचे संचालक शशिकांत जाधव व संजय कोठुळे यांनी केले.
हे अत्याधुनिक वेयरहाऊस महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या संपूर्ण भारतभरात विस्तारलेल्या मल्टी-युजर सुविधांचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या सुविधांमार्फत ग्राहकांना उत्पादन आणि पूर्तता कामांमध्ये मदत पुरवली जाते. हे नवे वेयरहाऊस ई-कॉमर्स, ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादन व अभियांत्रिकी उद्योगक्षेत्रांना साहाय्य पुरवेल.
बिल्ट-टू-सूट (बीटीएस) पद्धतीचे हे वेयरहाऊस महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे, यामध्ये रिसायकल करण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचा वापर, द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन आणि अत्याधुनिक ऑटोमेशन यांचा समावेश आहे. वेयरहाऊसमध्ये ऑनसाईट सोलर ऊर्जा निर्मिती क्षमता असून त्याद्वारे ऊर्जेच्या संपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातात. कार्गो वाहने आणि व्यक्तिगत वाहनांसाठी सोलर चार्जिंगची क्षमता देखील यामध्ये आहे.
लॉजिस्टिक्स क्षेत्रात भिवंडीनंतर नाशिकचे भौगोलिक स्थान अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. समृद्धी महामार्ग तसेच सुरत-चेन्नई हायवेमुळे नाशिकची कनेक्टिविटी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू अशा अनेक राज्यांसोबत होणार आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी नाशिक सोईस्कर ठरत आहे. त्याच अनुषंगाने महिंद्रा लॉजिस्टिकसने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ रामप्रवीण स्वामिनाथन यांनी यावेळी सांगितले, “या नव्या फॅसिलिटीमध्ये जागतिक दर्जाच्या वेयरहाऊसिंग पायाभूत सोयीसुविधांचे भारतभर पसरलेले नेटवर्क ग्राहकांना पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. आमच्या ग्राहकांना एकीकृत, त्यांच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या सुविधा पुरवण्यावर आणि पूर्तता करण्यावर आमचा भर कायमच राहील आणि त्यासाठी प्रचंड मोठे वेयरहाऊसिंग नेटवर्क अतिशय महत्त्वाचे आहे. द्वितीय श्रेणी शहरांमध्ये अधिक मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचा विस्तार करण्याच्या आमच्या योजनेचा भाग म्हणून आम्ही हे वेयरहाऊस सुरु करत आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे नवे वेयरहाऊस म्हणजे एक मापदंड आहे. २०४० सालापर्यंत कार्बन तटस्थ होण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे पुढचे पाऊल आम्ही उचलले आहे.