एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने जागतिक भरडधान्य (श्री अण्णा) परिषदेत भरडधान्य मानकांवरील एक संकलन जारी केले. अलीकडेच अन्न सुरक्षा प्राधिकरणाने प्रथमच बाजरीच्या १५ वाणांसाठी तसेच बाजरी उत्पादनांसाठी समूह मानकांचा सर्वसमावेशक संच अधिसूचित केला आहे. सप्टेंबरपासून हे नियम लागू होतील.
यामध्ये बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, नाचणीचे पीठ आणि मिश्रित बाजरीचे पीठ या मानकांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले, 'देशात भरडधान्यांना वैज्ञानिक मार्गाने प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग म्हणजे नियामक मानके निश्चित करणे होय.
एफएसएसएआयने प्रथमच आपण आपल्या देशात उत्पादित केलेल्या सर्व 15 प्रकारच्या भरडधान्यांसाठी मानकांचा सर्वसमावेशक गट केला आहे. यामुळे देशातील भरडधान्य आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित होईल.
अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू म्हणाले, यामुळे आम्हाला अधिक चांगले मूल्य प्राप्ती आणि ब्रँड बिल्डिंग मिळण्यास मदत होईल. एफएसएसएआयच्या अधिकार्यांनी सांगितले की, अनेक भरडधान्यांचे मूळ भारतात आहे, त्यांच्यासाठी प्रथमच मानके निश्चित करण्यात आली आहेत.
आफ्रिकेत काही भरडधान्यांसाठी मानके आहेत, तर कोडेक्समध्ये फक्त ज्वारी आणि बाजरीसाठी मानक आहेत. त्यामुळे अनेक भरडधान्ये ही भारतातील मूळ पिके आहेत. उदाहरणार्थ, नाचणीला अमेरिकेत मानक नाहीत. भारताने प्रथमच भरडधान्यांसाठी मानकांचा सर्वसमावेशक गट प्रकाशित केला आहे, असे एफएसएसएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(स्रोत ः अपेडा)