चालू आर्थिक वर्षाच्या महसुलात १५-१७ टक्के वाढ अपेक्षित
एटीएम न्यूज नेटवर्क: चालू आर्थिक वर्षात भारतीय कृषी रसायन क्षेत्राची 15 ते 17 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे, असे क्रिसिल या मूल्यांकन करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. भक्कम निर्यात आणि स्थिर देशांतर्गत मागणी यामुळे गेल्या आर्थिक वर्षात हीच वाढ 23 टक्के नोंदवली गेली आहे.
भारताला जागतिक कंपन्यांच्या ‘चीन प्लस वन’ या धोरणाचा फायदा होत असल्याने 2023-24 आर्थिक वर्षात महसुलात आणखी 10-12 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. आगामी काळात कृषिनिविष्ठांच्या किमती वाढल्या तरीही चालू आणि पुढील आर्थिक वर्षात महसुलवाढीचा 15 ते 16 % वर टिकवून ठेवण्यास मदत मिळणार आहे. भांडवली खर्च भूतकाळातील समान पातळीवर सुरू राहील. परंतु खेळत्या भांडवलात वाढ झाल्यामुळे कर्जे जास्त होतील, असे क्रिसिलने म्हटले आहे.
तथापि, मजबूत रोख निर्मितीमुळे कृषी रसायन कंपन्यांचे क्रेडिट प्रोफाइल ‘स्थिर’ राहणे अपेक्षित आहे. क्रिसिलच्या संचालक पूनम उपाध्याय म्हणाल्या की, पुढील आर्थिक वर्षात निर्यातीत 12-14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक कंपन्यांनी पुढील दोन वर्षांत 4 अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीच्या कंपन्यांवर लक्ष ठेवले आहे. परिणामी, कृषी रसायन क्षेत्रामध्ये निर्यातीचा मोठा वाटा राहील आणि एकूण महसुलाच्या 53 टक्के वाटा असेल.