एटीएम न्यूज नेटवर्क : भारतीय कृषी संशोधन संकुल फॉर ईशान्य क्षेत्र (आयसीएआर-एनईएच) मणिपूर केंद्रातील शास्त्रज्ञांनी आरसी मनिचाखाओ-१ नावाची उच्च उत्पन्न देणारी काळ्या तांदळाची नवीन जात विकसित केली आहे. ज्याची उत्पादन क्षमता ४.५ ते ५ टन टन/परी (मणिपुरी युनिट) आहे.
आरसी मनिचाखाओ-१ हे शास्त्रज्ञ यांच्या गटाने विकसित केले आहे. जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगचे शास्त्रज्ञ सलाम गुनामनी, इरेंगबम मेघचंद्र, नगंखम उमाकांता, निंगथौजम अजितकुमार, कोलोम रबी, लींदा मोन्सांग, एन जॉन्सन, एल सोमेंद्रो, थोकचोम मोतीलाल, रोबेन रोबेन, ला रोबेन, डॉ कोन्सम सारिका यांच्या देखरेखीखाली ही जात विकसित केली आहे.
तांदुळाच्या या नव्या जातीविषयी बोलतांना या शास्त्रज्ञांनी सांगितले की आरसी-मनिचाखाओ हा काळ्या तांदळाचा उच्च उत्पन्न देणारा प्रकार आहे. जो प्रतिकूल हवामानातही, जास्त पावसातही प्रतिकार करू शकतो. त्यांनी असेही सांगितले की आरसी-मनिचाखाओच्या विकासामुळे स्थानिक काळ्या तांदूळ उत्पादकांना त्यांचे शेतीचे उत्पादन वाढवण्यास आणि त्यांची कमाई वाढेल.
मणिपूरमध्ये सामान्यतः लागवड केलेल्या काळ्या तांदूळाची विविधता अशी आहे कि त्याची उंची (१५० सेमीपेक्षा जास्त) आहे आणि कमी पाण्यातही उभे राहण्याची प्रतिकारशक्ती आहे. मणिपूरमध्ये नेहमीचा वाण कमी उत्पादन देतो म्हणून बरेच शेतकरी काळा तांदूळ पिकवण्यास तयार नाहीत परंतु मनिचाखाओ जातीचे उत्पादन त्यापेक्षा अधिक येत असल्याचे शाश्रज्ञ यांनी स्पष्ट केले. चाखाओला वाणाला भारत सरकारने भौगोलिक संकेत (जीआय) दर्जा बहाल केला आहे.
ते म्हणाले की आरसी मनिचाखाओ-१ ची लागवड करण्यास स्वारस्य असलेल्या कोणालाही डॉ. कोन्सम सारिका यांच्याशी त्यांच्या लॅम्फेलपट येथील केंद्रावर किंवा ई-मेल : konsams@gmail.com वर संपर्क साधता येईल.