एटीएम न्यूज नेटवर्क : केमिकल सोल्युशन कंपनी बीएएसएफने शेतकऱ्यांसाठी शोषक कीटकांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी एफिकॉन एक नवीन कीटकनाशक भारतात लाँच केले आहे. नवीन आयआरएसी गट ३६ अंतर्गत वर्गीकृत केलेले (गट 36 -पायरिडाझिन) हे उत्पादन कीटकनाशकांच्या नवीन वर्गाचे प्रतिनिधित्व करते
शोषक कीटकांमुळे भारतातील पिकांना मोठा धोका निर्माण होतो. ज्यामुळे उत्पादकता आणि उत्पन्नामध्ये ३५ ते ४० टक्के एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. देशातील शेतकरी आता एफिकॉनच्या मदतीने हे आव्हान हाताळू शकतात असे बीएएसएफ इंडिया, कृषी सोल्युशन्सचे व्यवसाय संचालक गिरीधर रानुवा हे म्हणाले. बीएएसएफच्या काही भारतीय आणि जागतिक नेत्यांसोबत त्यांनी सोमवारी येथे उत्पादन लाँच केले.
हे कीटकनाशक ऍफिड्स, जॅसिड्स आणि पांढरी माशी यासारख्या कीटकांच्या जीवनचक्र तोडण्यासाठी प्रभावी आहे. एफिकॉन हे त्वरीत कीटकांना आहार देण्यापासून आणि झाडाला इजा होण्यापासून थांबवत असल्याचे बीएएसएफचे एशिया पॅसिफिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिमोन बारग यांनी सांगितले.
१०.१ अब्ज युरोची विक्री करणाऱ्या बीएएसएफच्या कृषी सोल्युशन्स डिव्हिजनने २०२३ मध्ये संशोधन आणि विकास या वर ९०० दशलक्ष गुंतवणूक केली.
बीएएसएफ चे २,३३५ कर्मचारी भारतात असून आठ ठिकाणी उत्पादन स्थळे आणि ४२ कार्यालये आहेत. २०२३ मध्ये बीएएसएफने भारतात सुमारे २.४ बिलियनची विक्री केली आहे.