जैवउत्तेजकाद्वारे ऊस उत्पादनवाढीचा दावा
एटीएम न्यूज नेटवर्क: कृषी क्षेत्रात जैविक उत्पादनांची निर्मिती करणारी प्लांट हेल्थ केअर आणि जागतिक जैवतंत्रज्ञानात अग्रेसर नोव्होझाइम्स साउथ एशिया प्रा. लि. ने कंपनीदरम्यान भारतात ऊस उत्पादनात वापरण्यासाठी हार्पिन αβ (Harpin αβ) या जैवउत्तेजकाच्या विशेष वितरणासाठी करार झाला आहे.
आवश्यक नियामक मंजुरी मिळाल्यानंतर 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत पहिली व्यावसायिक विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. प्लांट हेल्थ केअरद्वारे भारतात आणलेले हे पहिलेच जैवउत्तेजक उत्पादन आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश असून, सुमारे पाच दशलक्ष हेक्टर उसाचे क्षेत्र लागवडीखाली आहे. 2018 मध्ये लाँच झाल्यापासून हार्पिन αβ ब्राझीलमध्ये 180,000 हेक्टरपेक्षा जास्त उसावर वापरला गेला आहे.
भारतात आधीच्या हंगामात नोव्होझाइम्सद्वारे मूल्यमापन केलेल्या हार्पिन αβ चा वापर केल्याने पीक उत्पादनात सरासरी 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. हार्पिन αβ वनस्पतीच्या स्वसंरक्षण प्रणालीला चालना देऊन मानवांमधील लसीकरणाप्रमाणेच सुधारित गुणवत्तेसह पोषक घटकांच्या वापराची कार्यक्षमता, अजैविक ताण सहनशीलता आणि वाढीव उत्पन्नासह प्रतिसाद देऊन कार्य करते.
प्लँट हेल्थ केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ट्वीडी म्हणाले, ब्राझीलमधील उसावरील आमच्या हार्पिन αβ उत्पादनाच्या यशाच्या आधारे जगातील उसाच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश असलेल्या भारतात उत्पादन लाँच करणे स्वाभाविक होते. नोव्होझाईम्स ही भारतातील उसासाठीच्या जैविक उत्पादनांची अग्रगण्य पुरवठादार कंपनी आहे. प्लांट हेल्थ केअरच्या तंत्रज्ञानासाठी एक बळकट वितरण भागीदार असेल.
नोव्होझाइम्स इंडियाचे कृषी विभागाचे व्यावसायिक प्रमुख म्हणाले, भारताच्या जैवइंधनांवरील राष्ट्रीय धोरणांतर्गत कल्पना केलेल्या स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमण साध्य करण्यासाठी उसाचे उत्पादन वाढवले पाहिजे. नोव्होझाइम्स भारतीय शेतकर्यांना प्लॅन्ट हेल्थ केअरसोबत काम करताना आनंदित आहे. क्रांतिकारी जैवउत्तेजक हार्पिन αβ हे उसाचे उत्पादन वाढविते आणि उत्कृष्ट आर्थिक उत्पन्न देते.