एटीएम न्यूज नेटवर्क : उत्तर प्रदेशातील भदोही येथील त्रिसागर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे शास्वत पांडे दरवर्षी जवळपास ३ कोटी कमावतात मूळचे भदोही (सात रविदास नगर), उत्तर प्रदेशचे, शास्वत पांडे हे "त्रिसागर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड" चे मालक आहेत.
जवळपास ३५७ शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या एफपीओने २०२३ मध्ये निर्यातीतून २ कोटी ८० लाखांची उलाढाल साधली आहे. मध्यस्थांना दूर करणे आणि शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट निर्यात करण्यास सक्षम करणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांना अधिक नफा मिळविण्यात मदत होईल.
शास्वत यांना त्यांच्या १०१ हेक्टर जमिनीवर भाजीपाला पिकांची, विशेषत: मिरचीच्या उत्पादनाची उत्कृष्ट लागवड केल्याबद्दल कृषी जागरणने "एफपीओ ऑफ द इयर"ने सन्मानित केले आहे. सध्या ते पूर्वांचलमध्ये पहिले पॅकहाऊस स्थापन करण्यासाठी काम करत आहेत. ज्यामुळे जलमार्गाद्वारे मिरचीची निर्यात शक्य होईल. बनारस आणि लखनौला सध्या नियमित हवाई वाहतूक केली जात आहे.
शास्वत यांना अपेडा, जिल्हा कृषी कार्यालय आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्राकडून मदत मिळाली. ज्यांनी वाण, फील्ड आवश्यकता आणि इतर आवश्यक तपशीलांची माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या कृषी पणन मंडळाने त्यांना वाहतूक अनुदानही मंजूर केले आहे.
शेतकऱ्यांसाठी त्यांचा संदेश हा आहे की, शेतीकडे केवळ शेती म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून पहा. मध्यस्थांवर अवलंबून राहणे टाळावे, कारण यामुळे तुमचे उत्पन्न कमी होते. त्याऐवजी शेतकऱ्यांनी स्वत: बाजारपेठेतील संबंध प्रस्थापित करावेत. शेतकऱ्यांनी निर्यातदार होण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून ते त्यांची उत्पादने वाजवी किमतीत विकू शकतील आणि शाश्वत उत्पन्न मिळवू शकतील.