कांदा उत्पादकांना दिलासा?
- केंद्र सरकारकडून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये हमी दर जाहीर
- २६ मे २०२६ पासून नवा दर लागू
- कांद्याचा शासकीय खरेदी दर १२.३५ रुपये वरून १५.८० रुपये प्रति किलो
सरकारच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
- केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा निर्णय
- आदेश कृषी भवनातून जारी
- शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
कांदा उत्पादक संकटात
- बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी
- वाहतूक खर्चात वाढ
- साठवणुकीच्या अडचणी
- अवकाळी पावसाचा फटका
- बाजारातील मंदीमुळे शेतकरी अडचणीत
लासलगाव बाजार समितीतील कांदा दर
- कमाल दर : १,८१२ रुपये
- किमान दर : ५०० रुपये
- सरासरी दर : १,३५० रुपये
- सरासरी बाजारभाव अजूनही हमी दरापेक्षा कमी
आंदोलनानंतर सरकारची हालचाल
- कांद्याला हमीभाव मिळावा, यासाठी आंदोलने
- ‘नाफेड’ मार्फत थेट खरेदीची मागणी
- शासकीय खरेदी दर २,००० रुपये करण्याची मागणी
- विविध संघटनांचे आंदोलन
जाणकारांचे मत
- “दर वाढले तरी कोसळणारे भाव आटोक्यात येणार नाहीत”
- उत्पादन खर्च १८ ते २० रुपये प्रति किलोपर्यंत
- शासकीय दर मात्र १५.८० रुपये प्रति किलो
- हमी भाव नंतरही प्रति किलो २ ते ४ रुपयांचा तोटाच
शेतकऱ्यांचा सवाल
- “उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा का विकावा?”
- सरकारने अधिक व्यापक उपाययोजना कराव्यात
कांद्याला योग्य भावासाठी आंदोलन
- नाशिकमधील चांदवड येथे कांदा उत्पादकांचे आंदोलन
- मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा रस्त्यावर टाकून आंदोलकांची निदर्शने
- कांद्याला योग्य भाव व अनुदानाची मागणी
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
- कांद्याला स्थिर बाजारभाव
- ‘नाफेड’ मार्फत थेट खरेदी
- शासकीय खरेदी दर २,००० रुपये करावा
- शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा