SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

कृषीथॉनमध्ये द्राक्षशेतीच्या भविष्यासाठी विशेष चर्चासत्र

Nov 19, 2026
News Image

नाशिक : बदलते हवामान, मर्यादित जलस्रोत आणि उत्पादनातील आव्हाने लक्षात घेता द्राक्षशेती अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी कृषीथॉन २०२६ मध्ये 'द्राक्षशेती : बदलत्या हवामानात नवी दिशा, नवी संधी!' या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.   

रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता माडसांगवी, नाशिक येथे होणाऱ्या चर्चासत्रात द्राक्ष सल्लागार अनिल म्हेत्रे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक गणेश मोरे, सह्याद्री फार्म्सचे फार्म संशोधन, विकास व प्रमाणन प्रमुख पंकज नाठे आणि ऍग्रोहोमिओपॅथी विषयावर डॉ. वैभव जैन मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्राचे सूत्रसंचालन व मान्यवरांशी संवाद के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक तुषार उगले हे करणार आहेत.   

जलव्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, पीक नियोजन आणि द्राक्षशेतीतील नव्या संधींवर या चर्चासत्रात विचारमंथन होणार असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.   

स्थळ : कृषीथॉन २०२६, माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक.