एटीएम न्यूज नेटवर्क : इन्सेक्टिसाइड्स (इंडिया) लिमिटेडतर्फे 'ट्रॅक्टर ब्रँड' या त्यांच्या बहुआयामी ब्रँडसाठी बनविण्यात आलेल्या गीताचे अनावरण करण्यात आले. ब्रँड अॅम्बेसेडर आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याच्यासह शिनवा, मिशन, इझुकी, हरक्युलिस आणि सोफिया या प्रमुख आयआयएल उत्पादनांचा समावेश ही या गीताची वैशिष्ट्ये आहेत. या नावीन्यपूर्ण मोहिमेद्वारे भारतातील शेतकऱ्यांशी सखोल संबंध प्रस्थापित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
एफएमसीजी आणि कृषी/ग्रामीण श्रेणींमध्ये विशेष प्रसिद्ध असलेल्या बीइआय कॉनफ्ल्युन्स या जाहिरात एजन्सीने या मोहिमेची संकल्पना मांडली. ट्रॅक्टर ब्रँडबद्दल जागरुकता वाढविताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी हे गीत विविध व्यासपीठावर प्रसारित केले जाईल. भारतातील अतुलनीय विविधता दाखविताना अनेक भाषांमध्ये सादर केलेले नृत्य, संगीत, विनोद यांचे मिश्रण या गीतामध्ये समाविष्ट आहे.
इन्सेक्टिसाइड्स (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल म्हणाले, "दृश्यदृष्ट्या आकर्षक जाहिरातीमध्ये आनंद आणि विपुलतेची भावना दिसून येते. आमचा ट्रॅक्टर ब्रँड शेतकर्यांना भेडसावणार्या आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाय दर्शवितो. त्यांच्या उपजीविकेचे रक्षण करून आणि पीक संरक्षण आणि वाढीव उत्पन्नाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत योगदान देऊन आम्ही आमची भूमिका पूर्ण करत आहोत."
"ट्रॅक्टर ब्रँडने शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता आणि लोकप्रियता मिळवली आहे. आता हे नाते पुढच्या स्तरावर नेण्याचे आमचे ध्येय आहे. ही मोहीम शेतकर्यांशी जोडण्याची एक विलक्षण संधी आहे. हा उपक्रम प्रभावीपणे ट्रॅक्टर ब्रँडबद्दल संदेश देईल. तसेच उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्यांना आमच्या उत्पादनांची श्रेणी स्वीकारण्यास प्रोत्साहित करेल, अशी आम्हाला आशा आहे, असे ते म्हणाले.
ब्रँडचा असा अंदाज आहे की ही मोहीम एक उत्प्रेरक म्हणून काम करेल. कंपनीच्या 105 हून अधिक ब्रँडेड फॉर्म्युलेशन, ३८० हून अधिक एसकेयू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अधिक प्रभावी कामगिरी करेल. कंपनी सुमारे पाच नवीन उत्पादने सादर करण्याची योजना आखत असून, 2024 मध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे.