एटीएम न्यूज नेटवर्क ः शेतकऱ्यांमध्ये ट्रॅक्टरची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीची बहुतांश कामे सोपी होतात, म्हणूनच बहुतांश शेतकरी शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी करतात, परंतु सामान्य ट्रॅक्टरची किंमत जास्त असते. हा खर्च कमी करण्यासाठी भारतीय ट्रॅक्टर उद्योगात विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे.
सौरउर्जेवर चालणारे ट्रॅक्टर हळूहळू बाजारात येत आहेत. सौरउर्जेवर चालणारे ट्रॅक्टर बाजारात येतील, तेव्हा त्याचा वापर डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत खूपच कमी असेल. सध्या सरकार सौरउर्जेला प्रोत्साहन देत आहे. अशा परिस्थितीत सोलर ट्रॅक्टरचा कल वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही सौरउर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये, फायदे काय आहेत हे सांगणार आहोत. हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर ठरेल हेही सांगणार आहोत.
सौर ट्रॅक्टर म्हणजे काय?
सौरउर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरला सौर ट्रॅक्टर म्हणतात. या ट्रॅक्टरमध्ये सोलर पॅनल बसवण्यात आले असून, ते सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करून ट्रॅक्टरच्या बॅटरीमध्ये साठवतात. बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची मोटार आणि इतर उपकरणे जसे की पंप, हेडलाइट इत्यादीला ऊर्जा देण्यासाठी वापरली जाते.
डिझेल, विजेचा तुटवड्याचा अडसर नाही
आजच्या महागाईच्या काळात डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्याचबरोबर विजेचा दरही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून अनेक शेतकरी सौर ट्रॅक्टरकडे वळण्यास प्राधान्य देत आहेत. सौर ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी ट्रॅक्टर चालविण्यासाठी अक्षय्य ऊर्जेचा वापर करतील. महागड्या इंधनावर कमी अवलंबून राहिल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल. ग्रामीण भागातही सोलर ट्रॅक्टरचा मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?
सोलर ट्रॅक्टरमुळे शेत नांगरणी आणि इतर शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. यामुळे डिझेल, पेट्रोल, गॅसोलीन इत्यादी अपारंपरिक महागड्या ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल.
भारतात सौर ट्रॅक्टरची किंमत किती?
भारतातील सौर ट्रॅक्टरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, सौर ट्रॅक्टरची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे ट्रॅक्टर ब्रँड, मॉडेल आणि त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी. पारंपरिक डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत सौर ट्रॅक्टर अधिक महाग आहेत. भारतात मूळ सौर ट्रॅक्टरची किंमत 5 लाख ते 8 लाख रुपयांदरम्यान आहे. प्रदेश, राज्य आणि मागणीनुसार या किमती थोड्याफार प्रमाणात बदलू शकतात.
भारतातील काही सर्वोत्तम सोलर ट्रॅक्टर
भारतातील सर्वोत्कृष्ट सोलार ट्रॅक्टरबद्दल बोलायचे झाल्यास, सेलेस्टियल ई मोबिलिटी या हैदराबाद येथील कंपनीने सौर चार्जिंग तंत्रज्ञानासह भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर विकसित केला आहे. कंपनीने 27 एचपी, 35 एचपी आणि 55 एचपीचे तीन ट्रॅक्टर मॉडेल विकसित केले आहेत. या ट्रॅक्टरला सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळते. आत्ता कंपनीने किंमत, स्पेसिफिकेशनबद्दल जास्त खुलासा केलेला नाही. शेतकरी महिंद्रा सोलर ट्रॅक्टर " ई-मॅक्स 25 एचएसटी सोलर" देखील खरेदी करू शकतात. सौर ट्रॅक्टर्सबाबत अनेक आव्हाने आहेत. कारण ट्रॅक्टर कंपन्या सध्या सौर ट्रॅक्टर अधिक कार्यक्षम बनवण्यात गुंतल्या आहेत.
मात्र, सौर पॅनल बसवून शेतकऱ्यांना सोलार ट्रॅक्टरप्रमाणेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करून सुविधा मिळू शकतात. सौर पॅनलच्या मदतीने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चार्ज करता येते. भारतात अनेक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच झाले आहेत. जसे सोनालिका टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर. हे ट्रॅक्टर एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 8 तास शेतात वापरले जाऊ शकते. याशिवाय न्यू हॉलंड एनएच2, फार्मट्रॅक अॅटम 26 इत्यादी न्यू हॉलंडमधील सर्वोत्तम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मॉडेल आहेत.
सौर ट्रॅक्टरचा फायदा काय?
या ट्रॅक्टरमध्ये कमी किमतीचा आणि जास्त नफा असा शेतकर्यांना फायदा आहे. दुसरीकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सौर ट्रॅक्टरचा मोठा फायदा आहे. सौर ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरीही पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतात. हा ट्रॅक्टर हानिकारक पदार्थ सोडणार नाही आणि प्रदूषण कमी करेल.