एटीएम न्यूज नेटवर्क ः इन्सेक्टिसाइड्स इंडिया लिमिटेड ही भारतीय कृषी रसायन बाजारातील नामांकित कंपनी आहे. 2001 मध्ये स्थापन झाल्यापासून आयआयएल नेहमीच आघाडीवर राहिली आहे. कंपनीकडून राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण धोरण आणि दूरदृष्टीमुळे कंपनीचा बाजारातील वाटा वाढला आहे. बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीकोनातून कंपनीने लेथल, मिलक्लोर, लेथल सुपर आणि मिलरॉन हे ब्रँड ताब्यात घेतले आहेत.
31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कृषी रसायन क्षेत्रातील कंपनी इन्सेक्टिसाइड्स इंडिया लिमिटेडच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 13 टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, तो 9.36 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीचा निव्वळ नफा 8.25 कोटी रुपये इतका होता.
या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 314.64 कोटी रुपयांवरून 356.90 कोटी रुपये झाला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
2022-23 आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत निव्वळ नफा 85.09 कोटींवरून वाढून 92.50 कोटी रुपये झाला आहे.
या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण उत्पन्न वाढून 1,500.28 कोटी रुपये झाले. तर मागील वर्षी हेच उत्पन्न 1,228.16 कोटी रुपये होते.
इन्सेक्टिसाइड्स इंडियाने भारतात चोपंकी (राजस्थान), सांबा, उधमपूर (जम्मू आणि काश्मीर), आणि दहेज (गुजरात) येथे प्रकल्प सुरू केले आहेत. कंपनीकडून कीटकनाशके, तणनाशके आणि बुरशीनाशकांपासून वनस्पतींच्या वाढीच्या नियामकांपर्यंतच्या उत्पादनांची निर्मिती केले जाते.
(स्रोत ः news.agropages.com)