एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था (इफको) ही कृषी विद्यापीठे आणि तांत्रिक संस्थांच्या तांत्रिक सहकार्याने संपूर्ण देशात ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीसारख्या नॅनो खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे.
ड्रोनाई या एकीकृत कार्यक्रमाद्वारे ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोबाईल तंत्रज्ञान एकत्र करून नॅनो खते आणि इतर कृषी रसायनांच्या फॉलीअर ऍप्लिकेशनला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मोबाइल अॅपद्वारे या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना कार्यक्षम, किफायतशीर आणि सुरक्षित फवारणी करता येणार आहे. फवारणी करताना, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअरद्वारे पिकाची वाढ आणि आरोग्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीसाठी मार्गदर्शन करता येणार आहे.
ग्रामीण उद्योजकता निर्माण होण्याच्या दृष्टिने एक यशस्वी ड्रोन फवारणी प्रणाली तयार करणे, ग्रामीण युवक/शेतकऱ्यांच्या समन्वयाने प्रणाली चालवणे आणि त्यांना प्रगत तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ड्रोन, त्यांचे वाहतूक वाहन आणि सुरक्षित उड्डाण यांच्याशी संबंधित सर्व अनिवार्य नियम या प्रक्रियेत अंतर्भूत आहेत. शेतकरी अनुकूल मोबाइल अॅपद्वारे समन्वयित आहेत. त्यामुळे या उच्च दर्जाच्या, एकात्मिक ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात प्रचार केला जाऊ शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना उच्चतंत्रज्ञान आधारित स्मार्ट शेतीचा सराव करण्यास मदत होईल.
कृषी क्षेत्रात प्रभावी ड्रोन तंत्रज्ञानाचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यास ड्रोनाई मदत करणार आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात मोठ्या भागात सुरक्षितपणे नॅनो खत आणि कृषी रसायन फवारणीला प्रोत्साहन देणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनच्या सुरक्षित वाहतुकीसाठी खास इलेक्ट्रिक ट्रायव्हिलरची रचना करण्यात आली आहे. एकात्मिक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म जे कोणत्याही मोबाईलच्या खाली चालू शकते. ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल.
याशिवाय, अॅपच्या एका क्लिकवर शेतकऱ्यांना फवारणीचे आगाऊ बुकिंग करण्यास मदत होईल. ड्रोनाई तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्यांचा फवारणीचा खर्च 50 टक्क्यांनी कमी होईल आणि वेळेची बचत होईल. कृषी रसायनांचा हाताने फवारणी करण्याशी संबंधित त्रास आणि आरोग्य समस्या टळतील.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)