एटीएम न्यूज नेटवर्क : अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विविध तीन प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे आकार कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे प्रकल्प कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात आले असून ‘सुधारित फळ पिकांतर्गत मोठ्या प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक शेतीचा विकास’ हा प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे.
या प्रकल्पाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अत्याधुनिक बियाणे तपासणी प्रयोगशाळेसाठी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी दोन कोटी चार लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातून अत्याधुनिक बियाणे तपासणी प्रयोगशाळा उभारली जाईल. दुसऱ्या प्रकल्पासाठी शासनाने दोन कोटी चार लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली असून या निधीतून तृणधान्य बियाणे वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात तृणधान्यांचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. हा प्रकल्प विद्यापीठाच्या संशोधन संचालकांच्या अखत्यारीत राबवला जाणार आहे.