एटीएम न्यूज नेटवर्क : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी नॅशनल को ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लि.(एनसीओएल) द्वारे उत्पादित भारत ऑरगॅनिक आटा आणि नवी दिल्लीतील मयूर विहार येथे पहिल्या अमूल ऑरगॅनिक शॉपचे उद्घाटन केले.
गुजरातमधील एका कार्यक्रमात अमूलचे नवी दिल्लीतील पहिले ऑरगॅनिक शॉप आणि "भारत ऑरगॅनिक आटा" लाँच करताना केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, "अमूल" आणि "भारत" ब्रँड अंतर्गत उपलब्ध होणारी सेंद्रिय उत्पादने १०० टक्के अस्सल आहेत. याची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणी केली आहे.
गांधीनगर येथील महात्मा मंदिरात १०२ व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाला संबोधित करताना शहा यांनी दोन सेंद्रिय ब्रँडचे समर्थन केले आणि ते म्हणाले कि “आमच्याकडे दोन सेंद्रिय ब्रँड आहेत. एक एनसीओएलची भारत ऑरगॅनिक्स आणि दुसरी अमूल. दोन्ही विश्वसनीय ब्रँड आहेत. मला देशातील जनतेला आवाहन करायचे आहे की त्यांनी या ब्रँडवर विश्वास ठेवावा आणि ते विकत घ्या. ते १०० टक्के सेंद्रिय आहेत आणि भारत सरकारने याची खात्री केली आहे. जगात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऑरगॅनिक ब्रँड अंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे अन्न खरोखरच अस्सल सेंद्रिय उत्पादन आहे की नाही याची तपासणी करण्यात आले आहे.”
गुजरातमधील कार्यक्रमादरम्यान शहा यांनी एनसीओएलद्वारे उत्पादित भारत ऑरगॅनिक आटा आणि नवी दिल्लीतील मयूर विहार येथे पहिल्या अमूल ऑरगॅनिक शॉपचे उद्घाटन केले. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी गुजरात सरकारचे आभार मानले.
२०२९ च्या अखेरीस भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याबाबत बोलताना शाह म्हणाले, “कोणताही जिल्हा व्यवहार्य, जिल्हा सहकारी बँक किंवा व्यवहार्य दूध सहकारी संस्थाशिवाय राहू नये. हे केले तरच सहकार चळवळीचा पाया वाढू शकतो. देशात अजूनही दोन लाख पंचायती आहेत ज्यात एकही सहकारी संस्था नाही. आम्ही बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
शहा पुढे म्हणाले की त्यांच्या मंत्रालयाने पीएसीएस कमकुवत का होते याचे विश्लेषण केले आहे. “शेती कर्ज देऊन आता फारसा फायदा नाही. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज मिळावे. म्हणून आम्ही पीएसीएससाठी मॉडेल उपनियम तयार केले. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, पीएसीएस हा राज्याचा विषय असूनही सर्व राज्यांनी हे मॉडेल उपनियम स्वीकारले आहेत. आम्ही पीएसीएस बहुउद्देशीय बनवले आहे. ते दुग्धव्यवसाय म्हणून काम करू शकते. स्वस्त धान्य किंवा औषधे विकणारी दुकाने उघडू शकते, खते विकू शकते, पेट्रोल पंप स्थापित करू शकते, रेल्वे किंवा विमानाचे तिकीट बुकिंग करू शकते.