एटीएम न्यूज नेटवर्क: अन्न आणि कृषी तंत्रज्ञान मंच असणाऱ्या 'आउटग्रो'द्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या "फिजिटल" या शेतकरी संवाद प्लॅटफॉर्मची भर घालून वेकूलने आपल्या कृषीनिविष्ठा पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा केली. त्याच अनुषंगाने वेकूल आणि यूपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड यांनी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही भागीदारी शेतकऱ्यांना सर्वसमावेशक कृषी सल्लागार सेवा देत पीक उत्पादन वाढविण्यासाठी सर्वांगीण पीक संरक्षण उत्पादने देण्याचा प्रयत्न करणार आहे.
वेकूल फूड्सचे सहसंस्थापक संजय दासारी म्हणाले, भारतात बदलते हवामान आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या पीक संरक्षण उत्पादनांची आवश्यकता आहे. कीटक आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे उत्पादकतेच्या जवळपास 25% नुकसान होते. त्यामुळे देशातील अन्न सुरक्षेसाठी पीक संरक्षण हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही वेकूलच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताची अन्न सुरक्षा वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, अधिक चांगली उत्पादने सादर करून दर्जेदार आणि सुरक्षित अन्न वाढवण्याच्या दिशेने काम करणे ही आमची उद्दिष्टे आहेत.
वेकूल फूड्सच्या आउटग्रो आणि शेतकरी कार्य विभागाचे प्रमुख एन. सेंधील कुमार म्हणाले, आम्ही यूपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लिमिटेडसोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. या करारामुळे यूपीएलची उत्पादने कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि तामिळनाडू राज्यांमधील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील. पीक संरक्षण करून सकारात्मक परिणाम होईल. या भागीदारीमुळे शेतकरी आता रोगाच्या प्रादुर्भावाचा शोध घेऊन शाश्वत पीक उपायांद्वारे पीक उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक सुसज्ज होतील.
भागीदारीबद्दल बोलताना यूपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लि.चे प्रादेशिक संचालक आशिष डोभाल म्हणाले, आम्ही एक सर्वसमावेशक शेतकरी इकोसिस्टम तयार करण्यासह प्रत्येक अन्न उत्पादन शाश्वत करण्यासाठी गेम चेंजर बनण्याचे ध्येय ठेवले आहे. वेकूलसोबतच्या या सहकार्यामुळे शेतकर्यांच्या मोठ्या संचाला उच्च दर्जाचे पीक संरक्षण आणि बायो सोल्युशन्सचा संतुलित पर्याय मिळेल. प्रगत तांत्रिक इंटरफेसद्वारे शेती शाश्वत होईल, उत्पन्न वाढेल आणि शेतकर्यांचे उत्पन्न सुधारेल.