एटीएम न्यूज नेटवर्क ः शेतीची कामे करण्यासाठी विविध कंपन्यांचे अत्याधुनिक अवजारे आणि मशीन बाजारात येत आहेत. अनेक कंपनींचे ट्रॅक्टरही बाजारात उपलब्ध आहेत. आता मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक हे नवीन ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध झाले आहे, अशा आशयाचे वृत्त ट्रॅक्टर जंक्शन डॉट कॉमवर प्रसिद्ध केले आहे. या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊ या.
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक हे 50 एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर असून, त्याची रचना अतिशय आकर्षक आहे. या ट्रॅक्टरमध्ये तरुण शेतकरी आकर्षित होणारे वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ट्रॅक्टरचे बळकट इंजिन चांगले मायलेज देते आणि दीर्घकाळ काम करते. बळकट इंजिनमुळे ट्रॅक्टर सर्व शेती अवजारे सहजतेने ओढू शकते. ट्रॅक्टरची ब्रेक यंत्रणा अतिशय उत्कृष्ट असून, ते सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच चालविण्यासही आरामदायी आहे. ट्रॅक्टरमध्ये ड्युअल क्लच आहे. यात 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर्ससह एक उत्कृष्ट गिअरबॉक्स आहे. ट्रॅक्टरचा वेग खूप चांगला आहे. या ट्रॅक्टरची 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. बळकट ट्रॅक्टरचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांना मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक ट्रॅक्टर एक चांगला पर्याय असू शकतो.
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅकची वैशिष्ट्ये:
इंजिन
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक ट्रॅक्टर 3 सिलिंडरसह मिळते. ट्रॅक्टरला 3300 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 2200 रेटेड आरपीएम ऊर्जा निर्माण करते. या 50 HP ट्रॅक्टरची पीटीओ क्षमता 46 एचपी आहे. शेतातील इतर शेती उपकरणे आणि मशीनसोबत हे ट्रॅक्टर चांगले कार्य करते. त्याचा टॉर्क 200 एनएम आहे.
ट्रान्समिशन
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एच पी ट्रॅक्टरला कफिमेश (फुल्ली कॉन्स्टंट मेश) प्रकारचे ट्रान्समिशन दिले जाते. हे ट्रॅक्टर ड्युअल क्लचसह मिळतो. या ट्रॅक्टरला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर्स आहेत. या ट्रॅक्टरचा वेग खूप चांगला असून, चांगले मायलेज देतो.
ब्रेक आणि स्टिअरिंग
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एचपी ट्रॅक्टर स्किडिंग टाळण्यासाठी ऑइल इमर्स्ड ब्रेक्ससह मिळतो. यात पॉवर टाईप स्टिअरिंग देण्यात आले आहे, हे खूपच लवचिक आहेत. या ट्रॅक्टरमध्ये आरपीटीओ टाईप पॉवर टेक ऑफ आहे.
हायड्रॉलिक
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एचपी ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता प्रभावी आहे. हे ट्रॅक्टर 1800 किलोपर्यंत वजन सहज उचलू शकतो. यासोबतच ट्रॅक्टर 3 पॉइंट लिंकेज मेस्सी इंटेलिसेंस हायड्रोलिक्स सिस्टमने सुसज्ज आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 2240 किलो आहे. या ट्रॅक्टरचा व्हील बेस 2000 मिमी आहे. या ट्रॅक्टरची एकूण लांबी 3460 मिमी आणि रूंदी 1800 मिमी आहे. त्याचा ग्राउंड क्लियरन्स 430 मिमी आहे.
चाके आणि टायर
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एचपी ट्रॅक्टर 2 डब्ल्यूडी ट्रॅक्टर म्हणजेच टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. त्याचे पुढचे टायर 7.5 x 16 आणि मागील टायर 14.9 x 28 आकाराचे आहेत.
सामान आणि सुविधा
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एचपी ट्रॅक्टर सोबत कंपनी अपलिफ्ट किट, ट्रान्सपोर्ट लॉक व्हॉल्व्ह (टीएलव्ही), पाण्याची बाटली, मोबाईल चार्जर आणि होल्डर, चेन स्टॅबिलायझर इत्यादी सामान ठेवण्याची सुविधा तसेच आरामदायी ड्रायव्हर सीट आहे.
किंमत
मॅसी फर्ग्युसन 8055 मॅग्नाट्रॅक 50 एचपी ट्रॅक्टरची किंमत रु. 6.80 लाख ते रु. 7.40 लाख (एक्स शोरूम किंमत) आहे. कर, आरटीओ शुल्क, तुम्ही निवडलेले मॉडेल, अॅड-ऑन अॅक्सेसरीज इत्यादींमुळे ऑन-रोड किंमत बदलू शकते. याशिवाय, तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनच्या वेबसाइटवर जाऊन मॅसी मिनी ट्रॅक्टर, मॅसी फर्ग्युसन 2022 मॉडेल, मॅसी 1035 यासह कंपनीच्या इतर ट्रॅक्टरची किंमत पाहू शकता.
(स्रोत ः www.tractorjunction.com)
(फोटो सौजन्य ः masseyfergusonindia.com)
अॅग्री ट्रेड मीडियावर इंग्रजी आणि मराठीमध्ये कृषी-व्यवसायासंदर्भात बातम्या वाचा आणि रहा अपडेट. झटपट अपडेटसाठी Facebook, Instagram आणि YouTube वर Agri Trade Media चे सदस्य होण्यास विसरू नका.