एटीएम न्यूज नेटवर्क ः कोविड-19 नंतर जगात अन्न सुरक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे. कोविड काळात कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ किंवा कृषीमाल स्वच्छ करून किंवा हँडग्लोज घालून हाताळले जात असे. कापणीनंतर अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेत स्वच्छता राखणे मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे, हे जगभरातील लोकांना समजले.
याच पृष्ठभूमीवर कापणीपश्चात शेती मालावर जीवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुरान टेक्नॉलॉजीजने (Juran Technologies) पिकांचे मूल्य वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाचे संशोधन केले आहे.
इस्रायलच्या कृषी मंत्रालयाच्या कृषी संशोधन संस्थेच्या सहकार्याने जुरान टेक्नॉलॉजीजने एरिल सिस्टिम (ArilSystem) या मानवी संपर्काशिवाय डाळिंब काढण्याच्या प्रणालीसह EcoLychee (इकोलिची) ही सल्फरचा वापर न करता लिचीच्या सालीवर प्रक्रिया करण्यासाठीची एक प्रणाली अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केली आहे.
एरिल सिस्टिम द्वारे डाळिंब एका बाजूला आणि डाळिंबाचे आवरण दुसऱ्या बाजूला करणे शक्य होते. तेही मानवी संपर्काविना. शिवाय निर्जंतुकीकरण सामग्री वापरून उत्पादन स्वच्छ केले जाण्याची खात्री मिळते. या प्रणालीचा वापर करणार्या उत्पादनांची उच्च पातळीवरील अन्न सुरक्षा आणि रोगमुक्त असण्याची शक्यता जास्त असते.
जुरान टेक्नॉलॉजीज आणि एआरओ यांच्यातील सहकार्यावर आधारित कंपनीने जगभरात विक्री आणि सेवेसाठी डाळिंब काढण्याची प्रणाली विकसित केली आहे.
प्रक्रियेदरम्यान असे कोणतेही पदार्थ वापरले जात नाहीत जे उत्पादनावर नकारात्मक परिणाम करू शकतात किंवा ग्राहकांना हानिकारक ठरू शकतात, हे जुरान टेक्नॉलॉजीजने सुनिश्चित केले आहे.
उदाहरणार्थ, लिची फळाचा लाल सालाचा रंग टिकवण्यासाठी सल्फरचा वापर पारंपरिकपणे केला जातो. काही लोकांना सल्फर असलेल्या खाद्यपदार्थांची अॅलर्जी किंवा दम्याची अॅलर्जी असते. म्हणून ही सामान्य पद्धत काही ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते.
तथापि, लिचीची साल पिकलेली आणि ताजी ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे. जुरानने पिकलेल्या लिची फळांवर उपचार करण्याची एक सल्फरमुक्त पद्धत विकसित केली आहे. जी केवळ ग्राहकांसाठी सुरक्षित प्रक्रियाच सक्षम करत नाही, तर एक अतिरिक्त फायदा देखील देते. जुरानच्या लिचीचा साठवणकाळ चार किंवा पाच आठवड्यांपर्यंत असतो.
(स्रोत ः www.freshplaza.com)