एटीएम न्यूज नेटवर्क : आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेड या अग्रगण्य कृषी-जैविक कंपनीने क्रिकेटपट्टू युवराज सिंग यांची कंपनीचा पहिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
आयपीएल बायोलॉजिकल कंपनीच्या विस्ताराचे हे प्रतीक असून कंपनी वाढीच्या तीस वर्षांच्या प्रवासातला एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. एक मल्टीफॉर्मेट वर्ल्ड कप चॅम्पियन म्हणून ओळखला जाणाऱ्या युवराज सिंगचा प्रेरणादायी प्रवास आयपीएल बायोलॉजिकलच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जैविक उपाय पुरवून विकासाला चालना देण्याच्या कटिबद्धतेशी संबंधित आहे.
“आयपीएल बायोलॉजिकलशी जोडल्याबद्दल मी रोमांचित झालो असून कंपनीचे मायक्रोबायोलॉजिकल सोल्यूशन्स देऊन जगभरातील शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी मी उत्सुक असल्याचे क्रिकेटपटू युवराज सिंग म्हणाले.
आयपीएल बायोलॉजिकल प्रा.लि.चे श्री हर्षवर्धन भागचंदका यांनी सांगितले की, “आयपीएल बायोलॉजिकल कुटुंबात युवराज सिंगचे, आमचे पहिले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. युवराजचा उल्लेखनीय प्रवास आम्हाला प्रेरणा देतो आणि त्याचा आमच्या ब्रँडशी असलेला संबंध आमच्या विस्ताराच्या प्रवासातील एका रोमांचक अध्यायाची सुरुवात करत आहोत.”
आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेड शेतीसाठी जैविक उपायांमध्ये सुप्रसिद्ध आहे. कंपनीचा जैव-खते आणि जैव-कीटकनाशकांमध्ये विस्तृत पोर्टफोलिओ असून ज्यामध्ये रोग आणि कीटक व्यवस्थापन, वनस्पती पोषक आणि आरोग्य व्यवस्थापन आणि माती व्यवस्थापनासाठी ६० पेक्षा अधिक जास्त उत्पादने आहेत. आयपीएल बायोलॉजिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये ४८ शास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञांसह संशोधन आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आहे.