एटीएम न्यूज नेटवर्क : कृषीक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जीएसपी क्रॉप सायन्स कंपनीने पेटंटेड नवीन बुरशीनाशक एलिमेंट बाजारात सादर केले आहे. एलिमेंट हे संशोधित नाविन्यपूर्ण बुरशीनाशक असून संपूर्ण देशात एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने लाँच केले गेले.
या कार्यक्रमाला जीएसपी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री भावेश शाह, सेल्स अँड मार्केटिंगचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजेंद्र लांडगे, चीफ स्ट्रॅटेजिक मार्केटिंग ऑफिसर डॉ अमरनाथ चंद्रानी, प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट हेड श्री दीपक पटेल, मार्केटिंगचे जी एम श्री साधू जाधव सेल्स नॉर्थचे जीएम श्री. अजय जावला श्री प्रॉडक्ट मॅनेजर जी.एम. राधेश्याम सहभागी झाले होते तसेच या कार्यक्रमाला जी एस पी कंपनीची व्यवस्थापकीय टीमही उपस्थित होती.
मॅनेजिंग डायरेक्टर श्री भावेश शाह यांनी सर्व उपस्थित शेतकरी, वितरक व विक्रेते यांना संबोधित करतांना सांगितले कि, भारतीय शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याकरिता जीएसपी कंपनी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. कंपनीचे उत्पादने शेतकऱ्यांनी वापरून आपले उत्पादन वाढवावे असे आवाहनही त्यांनी केले. श्री राजेंद्र लांडगे यांनी भात पिकात येणाऱ्या मुख्य रोगाविषयी माहिती देऊन त्याच्या नियंत्रणविषयी माहिती दिली.
एलिमेंट हे एक संशोधित बुरशीनाशक असून त्यामध्ये थाईफ्लूजामाईड १५ टक्के + डाईफेनोकोनाजोल २० टक्के एससीचे संमिश्रण आहे, ज्याचा उपयोग भात पिकामध्ये येणारे विविध रोग पानावर येणार करपा, पान कूज, खोड कूज, पानावरील तपकिरी ठिपके, फाल्स स्मट, ग्रेन डिस्कॉलॉशन तसेच डर्टी पॅनिकल रोगाच्या नियंत्रणासाठी होतो. एलिमेंट हे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दुहेरी कार्यप्रणाली पद्धतीने भात पिकात येणाऱ्या रोगावर संपूर्ण नियंत्रण प्रदान करते. अधिक परिणामकारक नियंत्रणासाठी एलिमेंट वापराचे प्रमाण १५० ते २०० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यासोबत वापरावे.