एटीएम न्यूज नेटवर्क : सरकारने १ जूनपासून मच्छीमारांसाठी दोन विमा योजना एकत्र केल्या आहेत. ज्यामुळे प्रीमियमचा बोजा कमी होऊन अंमलबजावणीच्या समस्या देखील कमी होतील.
या नवीन एकत्रित योजनेअंतर्गत मच्छीमारांसाठी विमा संरक्षण प्रीमियम ८० रुपये प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आला आहे. जो जुन्या प्रीमियमपेक्षा १२ टक्के कमी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि गट अपघात विमा योजना (जीएआयएस) अंतर्गत विमा संरक्षण मच्छिमारांसाठी ५ लाख रुपयांचे सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान केला जाणारा आहे.
हे जीएआयएस अंतर्गत रू. ३ लाख रुपये अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व या बाबींसाठी आणि पीएमएसबीवाय अंतर्गत रु. २ लाख अशी एकूण ५ लाख रुपयांचे सर्वसमावेशक विमा संरक्षण आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन योजना पूर्णपणे अनुदानित आहे. मच्छीमारांना कोणताही प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपनीला भरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत सुमारे ३.२ दशलक्ष मच्छीमारांना विमा संरक्षण दिले जाते.
नॅशनल फेडरेशन ऑफ फिशर्स को ऑपरेटिव्ह लिमिटेड (फिशकॉफेड) ने काही महिन्यांपूर्वी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला पत्र लिहून मच्छीमारांसाठीची अपघाती विमा योजना काढून घेतल्याने मोठा धक्का बसल्याचा आरोप केला होता.
फिशकॉफेडला या योजनेत सामील झालेल्या प्रत्येक मच्छीमारामागे २ रुपये लाभ मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे, जो सहकारी संस्थेच्या कमाईचा मुख्य स्त्रोत होता. जेव्हापासून दुसरी कंपनी ही योजना चालविण्यास गुंतली आहे तेव्हापासून फिशकॉफेडच्या उत्पन्नाचा हा स्रोत आटला आहे.