एटीएम न्यूज नेटवर्क ः टेमासेक या गुंतवणूक कंपनीच्या मालकीच्या 'रिव्हुलिस'ने जैन इरिगेशन सिस्टिम लि. च्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचा समावेश असलेल्या एकाहून अधिक परदेशी उपकंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या कराराला नियामक मान्यता प्राप्त झाल्याचे रिव्हुलिसने जाहीर केले आहे, असे वृत्त अॅग्रोपेजेस डॉट कॉमने प्रसिद्ध केले आहे.
या संपादनामुळे जागतिक स्तरावर सिंचन व हवामान आघाडीवर उत्पादक आणि व्यावसायिक भागीदारांद्वारे आधुनिक सिंचन उपाय आणि डिजिटल शेतीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचे नेतृत्व रिव्हुलिस करणार आहे. सर्व सरकारी परवानग्या आणि समभाग खरेदी करारासाठी आवश्यक असलेल्या पूर्व अटी-शर्ती पूर्ण केल्यानंतर या संपादनाला अंतिम रूप देण्यात आले.
टेमासेक या गुंतवणूक कंपनीकडून करण्यात आलेली अतिरिक्त गुंतवणूक तसेच जैन इंडियाला नव्याने जारी केलेल्या समभागांसह संपादनासाठी रिव्हुलिस वित्तपुरवठा करणार आहे. याशिवाय जैन अमेरिका आणि नानदान जैन यांनी घेतलेल्या कर्जांना एचएसबीसी, राबोबँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आएनजी, बँक ल्युमी आणि इस्रायलची पहिली आंतरराष्ट्रीय बँक यासह आघाडीच्या बँकांनी स्वाक्षरी केलेल्या सिंडिकेटेड सुविधेद्वारे ताबडतोब पुनर्वित्त केले जाणार आहे.
रिव्हुलिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड क्लाफोल्झ म्हणाले, गेल्या जूनमध्ये कराराच्या घोषणेदरम्यान नमूद केल्याप्रमाणे दोन्ही कंपन्यांनी एक दीर्घकाळ टिकणाच्या उद्देशाने नेतृत्व करणारी कंपनी तयार करण्यासाठी हात मिळवला आहे, याचा आम्हाला आनंद झाला आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आपला जागतिक सिंचन व्यवसाय टेमासेकच्या मालकीच्या रिव्हुलिसमध्ये विलीन करण्याचा करार जून 2022 मध्ये केला होता. हा करार रोख आणि शेअर्सच्या स्वरूपात आहे. जैन इरिगेशनचा 4,200 कोटी रुपयांचा जागतिक सिंचन व्यवसाय आहे. यापैकी 2,700 कोटी रुपये संपूर्ण विदेशी कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील आणि 200 कोटी रुपये मूळ कंपनीकडे जातील. विलीन झालेल्या संस्थेमध्ये जैन इरिगेशनचा 22 टक्के इक्विटी हिस्सा असेल, तर रिव्हुलिसचा 78 टक्के हिस्सा असेल. यातून एकत्रित संस्थेसाठी 750 दशलक्ष डॉलर महसूल मिळू शकेल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली होती.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)